TRENDING:

शिवकालीन इतिहासाचा वारसा जपणारं दालन, पुण्यातील हा राजवारसा पाहायलाच हवा Video

Last Updated:

पिंपरी चिंचवडमध्ये राजवारसा नावाचं एक दालन सुरु केलं आहे. यामधून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजायला मदत होणार आहे. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
शिवानी धुमाळ, प्रतिनिधी
advertisement

पुणे : छत्रपती शिवरायांचे नाव घेतले तरी त्यांचा अवघा इतिहास लगेच डोळ्यांसमोर उभा राहतो. त्यांचा इतिहास नवीन पिढीसमोर यावा यासाठी पुण्यातील प्रज्योत पेंढारकर काम करत आहेत. यासाठी त्यांनी पिंपरी चिंचवडमध्ये राजवारसा नावाचं एक दालन सुरु केलं आहे. यामधून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजायला मदत होणार आहे. 

advertisement

छत्रपती शिवरायांचे कार्य समजणार

पिंपरी चिंचवडमधील चिंचवड गावात राजवारसा आर्टिफॅक्टस हे दालन सुरु करण्यात आलं आहे. मराठ्यांचा पराक्रम आगळ्यावेगळ्या स्वरूपात जतन करून सर्वदूर पोचविण्याचा प्रयत्न राजवारसाच्या माध्यमातून सुरु आहे. या ठिकाणी शिवकालीन वस्तू या आपण आपल्या प्रियजणांना भेटवस्तु म्हणून देऊ शकता. राज वारसा आर्टिफॅक्टसच्या माध्यमातून शिवकालीन शस्त्र, शिवरायांच्या मूर्ती, प्रतिमा या दालनात मिळत आहेत. या माध्यमातून आपण पुढच्या पिढीला छत्रपती शिवरायांचे कार्य समजणार आहे, असं प्रज्योत पेंढारकर यांनी म्हटलं.

advertisement

View More

साताऱ्यातील परळी खोऱ्यात शेकडो वर्षापूर्वीच्या स्मृतीशिळाचे संग्रहालय, अनोख्या ऐतिहासिक ठेव्याचा पाहा Video

या ठिकाणच्या वस्तू पाहून शिवरायांचा रोमांचकारी इतिहास आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. तलवार, वाघनखे, शिवरायांचा जिरेटोप, कवड्याची माळ यांच्या अनेक प्रतिकृती या ठिकाणी उपलब्ध आहेत. याठिकाणी धार नसलेली शस्त्रे उपलब्ध असून ही शस्त्रे तुम्ही तुमच्या घरी ठेवू शकता. या ठिकाणच्या वेगवेगळ्या कलाकृती पाहून तुम्ही नक्की थक्क व्हाल.

advertisement

बैलगाडा शर्यतीसाठी कोणता बैल खरेदी केला जातो, तो का असतो विशेष; संपूर्ण माहिती

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कमी खर्चात होईल जास्त कमाई, हिवाळ्यात घ्या ही भाजीपाला पिके, Video
सर्व पहा

लाठी काठी प्रशिक्षण, चित्रपट निर्मिती शस्त्र प्रदर्शन यांच्या माध्यमातून सुरु झालेली राजवारसाची वाटचाल ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीला दाखविण्याचे काम करत आहे. शिवरायांची युद्धनीती अभ्यासताना शिवरायांचे युद्धतंत्र आणि शस्त्र याची माहिती घराघरात पोहचविण्याचे काम राजवारसा आर्टिफॅक्टस निश्चितच करेल,असं पेंढारकर यांनी म्हटलंय.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
शिवकालीन इतिहासाचा वारसा जपणारं दालन, पुण्यातील हा राजवारसा पाहायलाच हवा Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल