साताऱ्यातील परळी खोऱ्यात शेकडो वर्षापूर्वीच्या स्मृतीशिळाचे संग्रहालय, अनोख्या ऐतिहासिक ठेव्याचा पाहा Video
- Published by:News18 Marathi
- Reported by:Shubham Sharad Bodake
Last Updated:
स्मृतीशिळा देशात किंवा राज्यात अनेक गावांत परिसरमध्ये अनेकदा पाहायला मिळतात. 55 स्मृतीशिळाचे खुले संग्रहालय सातारा येथील परळी खोरे गावामध्ये आहे.
शुभम बोडके, प्रतिनिधी
सातारा : सातारा जिल्हा ऐतिहासिक जिल्हा म्हणून ओळखला जातो. प्राचीन काळापासून सातारा जिल्ह्याचा नाम उल्लेख पोती-पुराणामध्ये देखील सापडतो. सातारा शहरापासून 20 किलोमीटर अंतरावर परळी खोरे गावामध्ये महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. या मंदिराजवळ अनेक प्राचीन स्मृतीशिळा, वीरगळ यांचे जतन मोठ्या प्रमाणावर केले आहे. अशा स्मृतीशिळा देशात किंवा राज्यात अनेक गावांत परिसरमध्ये अनेकदा पाहायला मिळतात. स्मृतीशिळा वरचा इतिहास शूरवीरांचा असल्याचा निदर्शनास येते. अश्याच 55 स्मृतीशिळाचे खुले संग्रहालय सातारा येथील परळी खोरे गावामध्ये आहे. याबद्दलची माहिती ग्रामस्थ आणि स्मृतीशिळा खुले संग्रहालयाचे ट्रस्टी सुरेश कोठावळे यांनी दिलीये.
advertisement
शेकडो वर्षापूर्वीच्या स्मृतीशिळा
साताऱ्यातील परळी खोरे गावात विविध ठिकाणी पाच ते सहा वीरगळी सुरुवातीला आढळून आल्या होत्या. या स्मृतीशिळेवर इतिहास अभ्यासक ज्यावेळी अभ्यास करण्यासाठी परळी खोरे गावात आले. त्यावेळी त्यांना आणखी काही वीरगळी आढळून आल्या. त्यानंतर त्यांनी या वीरगळीचा इतिहास ग्रामस्थांना सांगितला. ज्यावेळी परळी खोरे गावातील काही भागात खोदकाम केले. त्यावेळी त्यांना आणखी काही वीरगळी आढळून आल्या. वेगवेगळ्या आकाराचे, वेगवेगळ्या चिन्हांचे, त्यांच्या परंपरा, त्या काळातील शस्त्र, वेशभूषा, अलंकार याचे चित्रीकरण यावर आहे. या वीरगळी शेकडो वर्षापूर्वीच्या असल्याचे देखील सांगण्यात आलं. त्या काळातील युद्धांच्या इतिहासाचं चित्रीकरण या शिळामार्फत केल्याचे देखील इतिहास अभ्यासकांनी सांगितलं आहे, असं सुरेश कोठावळे सांगतात.
advertisement
मानेच्या त्रासामुळे सोडावे लागले सोनार काम, आलेल्या अडचणींवर मात करत किशोर यांनी यशस्वी केला चहा व्यवसाय, Video
या सोबतच उल्हाट यंत्र नावाच्या एका प्राचीन रणयंत्राचे चित्रकरण असल्याच्या दोन स्मृतीशिळा सापडल्या आहेत. या स्मृतीशिळा भारतात पहिल्यांदाच आढळून आल्या आहेत . प्राचीन काळातील यंत्रांना समजावून घेण्याच्या दृष्टीने या विरगळांचे महत्त्व अन्नसाधारण असल्याचे देखील सांगितले जात आहे. यावर मोठ्या प्रमाणावर संशोधन देखील जिज्ञासा इतिहास संशोधन आणि संवर्धन संस्था सातारा करत असल्याचे देखील सुरेश कोठावळे सांगितलं आहे.
advertisement
बैलगाडा शर्यतीसाठी कोणता बैल खरेदी केला जातो, तो का असतो विशेष; संपूर्ण माहिती
परळी खोरे गावात 55 वीरगळ आहेत. महादेव मंदिरच्या आवारात एका लाईनीमध्ये ठेवून त्या जतन करण्यात आलेल्या आहेत. यामुळे परळी गावात प्राचीन स्मृतीशिळेचे खुले संग्रहालय देखील नागरिकांसाठी आणि पर्यटकांसाठी करण्यात आलेले आहे, असंही सुरेश कोठावळे यांनी सांगितलं.
Location :
Satara,Maharashtra
First Published :
May 28, 2024 12:15 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सातारा/
साताऱ्यातील परळी खोऱ्यात शेकडो वर्षापूर्वीच्या स्मृतीशिळाचे संग्रहालय, अनोख्या ऐतिहासिक ठेव्याचा पाहा Video