TRENDING:

Pune Fire: कुठं झाडं, तर कुठं गॅलरीच जळाली, ऐन दिवाळीत पुण्यात अग्नितांडव, 3 दिवसांत 68 घटना

Last Updated:

Pune Fire: पुण्यात ऐन दिवाळीच्या 3 दिवसांत 68 ठिकाणी आग लागली. जीवितहानी झाली नसली तरी मोठे नुकसान झाले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे: दिवाळीच्या उत्साहात पुणे शहरात आतषबाजी मोठ्या प्रमाणात करण्यात आली. मात्र या उत्साहात शहरात काही ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या. 21 ते 23 ऑक्टोबर या दिवाळीच्या 3 दिवसांत पुणे शहरात आणि आसपासच्या उपनगरात तब्बल 68 ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या. यामध्ये जीवितहानी झालेली नसली तरी आर्थिक हानी मात्र मोठी झाली आहे.
Pune Fire: कुठं झाडं, तर कुठं गॅलरीच जळाली, ऐन दिवाळीत पुण्यात अग्नितांडव, 3 दिवसांत 68 घटना
Pune Fire: कुठं झाडं, तर कुठं गॅलरीच जळाली, ऐन दिवाळीत पुण्यात अग्नितांडव, 3 दिवसांत 68 घटना
advertisement

अग्निशामक दलाच्या आकडेवारीनुसार, 21 ऑक्टोबर रोजी म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सर्वाधिक 42 ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या. 22 ऑक्टोबर म्हणजेच पाडव्याच्या दिवशी 23 ठिकाणी आग लागली. तर भाऊबीज दिवशी तीन ठिकाणी आगीची घटना घडली. फटाक्यांची आतषबाजी करत असताना मोठ्या फटाक्यांच्या ठिणग्या या आकाशकंदील, कचरा किंवा घराच्या बंद गॅलरीत ठेवलेल्या वस्तूंवर पडल्याने आगीच्या घटना घडल्याचे समोर आले आहे. मुळे लागल्याचे समोर आले आहे.

advertisement

Pune News : नाशिक-पुणे बस प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! प्रवास करण्याआधी हे वाचा, नाहीतर...

कुठं लागली आग?

वारजे भागात असलेल्या दत्त मंदिराजवळील किराणा दुकानाला सायंकाळी लागलेल्या आगीमुळे दुकानातील माल जळून खाक झाला. अग्निशामक दलाकडून या आगीवर नियंत्रण आणण्यात आले. कसबा पेठेतील कागदीपुरा भागात इमारतीच्या चौथ्या मजल्यावर आग लागल्याने रहिवाशांचा गोंधळ उडाला. तर विमान नगर भागात झाड आणि विद्युत तारांना लागलेल्या आगीमुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. तर बाणेर-सुस रोडवरील आगीच्या घटनेत धुराचे लोट उठले होते.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मक्याच्या दरात सुधारणा, सोयाबीनला आज काय मिळाला भाव? VIdeo
सर्व पहा

दरम्यान, पुण्यातील धानोरी, हडपसर, कोंढवा, काळेपडळ, नवले, औंध, सिंहगड रोड, विश्रांतवाडी या भागात देखील लहान-मोठ्या आगीच्या घटना घडल्या. तिन्ही दिवस अग्निशमन पथक सतर्क होते. त्यामुळे माहिती मिळताच अग्निशमन दल तातडीने पाचारण करण्यात आले, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, असे अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितले.

मराठी बातम्या/पुणे/
Pune Fire: कुठं झाडं, तर कुठं गॅलरीच जळाली, ऐन दिवाळीत पुण्यात अग्नितांडव, 3 दिवसांत 68 घटना
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल