पुणे विमानतळावरून दररोज सुमारे दोनशे ते सव्वादोनशे उड्डाणे होतात आणि वार्षिक प्रवासी संख्येने एक कोटीचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे या रस्त्यावर प्रवाशांची आणि वाहनांची मोठी वर्दळ असते. प्रवाशांना बाराही महिने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो.
Weather Alert: 48 तास धोक्याचे, पुणे ते नाशिक 13 जिल्ह्यांत थंडीची लाट, हवामान विभागाचा अलर्ट
advertisement
या विकासामुळे पुणे शहराची ओळख, समृद्ध वारसा आणि संस्कृतीचे पहिले आणि शेवटचे प्रतिबिंब प्रवाशांच्या मनात उमटेल. लवकरच या महत्त्वाकांक्षी रुंदीकरण आणि सुशोभीकरण कामाला सुरुवात होणार आहे. हा रस्ता पुण्याची नवी ओळख बनेल, असे मत मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले.
भूसंपादनाचा मोठा अडथळा दूर
विमानतळ परिसरातील रस्ता प्रामुख्याने हवाई दलाच्या मालकीचा आणि काही खासगी मालकीचा आहे. हवाई दलाकडून जागा ताब्यात मिळण्यास दीर्घकाळ विलंब होत असल्याने रस्त्याचे रुंदीकरण रखडले होते. मात्र, आता हवाई दलाने नागपूर चाळ ते विमानतळपर्यंत रस्त्याच्या रुंदीकरणाला हिरवी झेंडी दिली आहे. त्याचप्रमाणे खासगी जागा मालकांनीही भूसंपादनासाठी संमती दर्शवली आहे. यामुळे नागपूर चाळ ते लोहगाव विमानतळापर्यंतच्या तीन किलोमीटर रस्त्याच्या रुंदीकरणाचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला आहे.
