विनोद वसंत माकोडे (वय ३२) आणि सागर रामकृष्ण बोदाडे (वय ३६, दोघे रा. सांगवी खुर्द, जि. अकोला) अशी शिक्षा सुनावलेल्यांची नावे आहेत. २ डिसेंबर रोजी पुणे महापालिका भवन परिसरात हे दोघे गैरवर्तन करत असल्याचे शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील कर्मचारी मखरे आणि तायडे यांना गस्तीदरम्यान आढळले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन त्यांची वैद्यकीय तपासणी केली असता, त्यांनी मद्यप्राशन केल्याचे उघड झाले. त्यानंतर त्यांच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
advertisement
Sahyadri Hospital: शिवसैनिकांकडून तोडफोड; सह्याद्री रुग्णालयात मोठा गोंधळ, नेमकं काय घडलं?
शिवाजीनगर पोलिसांनी न्यायालयात खटला दाखल केल्यानंतर माकोडे आणि बोदाडे यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. त्यांची गुन्ह्याची कबुली आणि गुन्ह्याचे स्वरूप लक्षात घेऊन न्यायालयाने त्यांना सामाजिक सेवेची शिक्षा ठोठावली. महाराष्ट्र शासन राजपत्र असधारण भाग ४ – क अन्वये ही शिक्षा सुनावण्यात आली. शिवाजीनगर पोलिसांच्या देखरेखीखाली या दोघांना सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता करावी लागणार आहे. १ जुलै २०२४ पासून देशभरात लागू झालेल्या नवीन फौजदारी कायद्यानुसार, किरकोळ गुन्ह्यांसाठी सामाजिक सेवा (Community Service) या शिक्षेचा पर्याय म्हणून समावेश करण्यात आला आहे, त्याच धर्तीवर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
