व्हेल माशाच्या उलटी विक्री करण्यासाठी पिंपरी चिंचवड मध्ये आलेल्या दोघांना हिंजवडी पोलीसांनी अटक केलंय. त्यांच्याकडून तब्बल 3 कोटी 27 लाख 60 हजार बाजारमूल्य असलेली 3 किलो पेक्षा अधिक वजनाची व्हेल माश्याची उलटी हस्तगत केलीय.
advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, रत्नागिरीवरून पुण्याच्या हिंजवडी-बावधन परिसरात काही तस्कर व्हेल माश्याची उलटी विक्रीस घेऊन आले असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली होती. त्या अनुषंगाने वनरक्षक सारिका दराडे यांच्य समक्ष पोलिसांनी सापळा रचून आरोपी नामे किशोर यशवंत डांगे आणि संदीप शिवराम कासार या दोघांना अटक करत त्यांच्या विरुद्ध वन्य जीव संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.
दरम्यान,अती महागडे सुगंधी अत्तर बनविण्यासाठी त्याचं बरोबर आमली पदार्थ बनविण्यासाठी देखील या उलटीचा वापर केला जात असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत याला मोठी मागणी आहे. तस्करांनी आणलेली ही व्हेल माशाची उलटी नेमकी कोणाला विकली जाणार होती? याबाबतचा तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.
