गजा मारणेची पत्नीच्या प्रचारासाठी फोनाफोनी
मारणेसह साथीदारांविरुद्ध पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई केली होती. मारणे बाहेर आल्यानंतर त्याची पत्नी निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. पण न्यायलयाने गजा मारणेला काही अटी शर्तीवर जामीन मंजूर केला होता. मात्र, गजा मारणेने पत्नीच्या प्रचारासाठी फोनाफोनी सुरू केली आहे. सध्या तडीपार असताना ही मारणेनं फोन वरून निवडणुकीत प्रभाव पाडायचा प्रयत्न केल्याने पुणे पोलिसांच एक पथक मारणेच्या मागावर आहे.
advertisement
पुणे पोलिसांनी कडक पाऊलं उचलली
गजा मारणेला पुणे शहरात येऊ द्यायला न्यायालयाने नकार दिला आहे. पत्नीच्या निवडणुकीच्या पार्शवभूमीवर पुण्यात येऊ द्यावं म्हणून गजा मारणे याने न्यायालयात अर्ज केला होता. त्यानंतर आता गजा मारणे फोनाफोनी करून लोकांना पत्नीला मतदान करा म्हणून आवाहन करत होता. अशातच आता गजा मारणेला रोखण्यासाठी पुणे पोलिसांनी कडक पाऊलं उचलली आहेत.
अमितेश कुमार म्हणाले...
दरम्यान, महापालिका निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांनी तयारी सुरू केली आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले उमेदवार, त्यांच्या नातेवाइकांवर पोलिसांनी नजर ठेवली आहे. गजा मारणे याने काही जणांशी संपर्क साधल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी त्याच्या हालचालींवर नजर ठेवली असल्याची माहिती अमितेश कुमार यांनी दिली.
