TRENDING:

Pune : निलेश घायवळ स्विझर्लंडला कसा पळाला? पासपोर्ट काढताना मुद्दामून केली एक चूक अन् पोलिसांना दाखवला 'कात्रजचा घाट'

Last Updated:

Nilesh Ghaiwal made deliberate mistake in passport : पुण्यातील कुख्यात गँगस्टर निलेश घायवळ याने पासपोर्ट काढताना पत्ता तर चुकीचा दिलाच पण एक मुद्दामून चूक देखील केली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Nilesh Ghaywal escape to Switzerland : पुण्यातील कोथरूडमध्ये दहशत पसरवण्याच्या हेतूने गोळीबार करून एका युवकावर हल्ला केल्याप्रकरणी घायवळ टोळीचा म्होरक्या निलेश घायवळ यावर पोलिसांनी कारवाई केली. घायवळ टोळीवर मकोका लावल्यानंतर निलेश घायवळ याने भारत सोडल्याची माहिती मिळाली आहे. निलेश घायवळ याने खोटी माहिती देखील पासपोर्ट काढला अन् परदेशी फरार झाला आहे. निलेश घायवळने गंभीर गुन्ह्यांमुळे पासपोर्ट मिळणे अवघड असल्याचे लक्षात येताच बनावट कागदपत्रांचा आधार घेतला. अशातच घायवळने पासपोर्ट काढताना असं काही डोकं चालवलं की पुणे पोलिसांच्या हाती लागणं कठीण झालं.
Nilesh Ghaywal made deliberate mistake in passport
Nilesh Ghaywal made deliberate mistake in passport
advertisement

पुणे पोलिसांना गुंगारा देऊन स्विर्त्झंलंडला

निलेश घायवळ हा सध्या विदेशात असून त्यांचे लोकेशन लंडन आहे, अशी माहिती समोर आली होती. मात्र, तो लंडनमधून नसून दुसऱ्याच देखील असल्याचं समजतंय. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी निलेश घायवळ सध्या स्विर्त्झंलंडमध्ये असल्याचं स्पष्ट केलं आहे. पण निलेश घायवळ पुणे पोलिसांना गुंगारा देऊन स्विर्त्झंलंडला कसा पोहोचला? असा सवाल विचारला जात होता. तर त्याचं उत्तर घायवळच्या पासपोर्टमध्ये आहे. घायवळने त्याच्या नावात मोठा बदल केला.

advertisement

पासपोर्टवर 'घायवळ’ऐवजी ‘गायवळ’

घायवळने नावात बदल करून ‘घायवळ’ऐवजी ‘गायवळ’ असे नमूद केले आणि अहिल्यानगरमधील खोटा पत्ता दाखवत 23 डिसेंबर 2019 रोजी तात्काळ पासपोर्टसाठी अर्ज दाखल केला होता. घायवळने Ghaywal या नावातील h काढून Gaywal असं केलं. त्यामुळे मोठे गुन्हे दाखल असताना देखील घायवळला पासपोर्टमुळे फरार होता आलं. सराईत गुन्हेगार निलेश घायवळ याच्या पासपोर्ट बाबत अहिल्यानगर जिल्हा पोलिसांकडून खुलासा आहे.

advertisement

पासपोर्ट पोलीसांकडे जमा करण्याचे आदेश पण...

पुण्यातील पासपोर्ट कार्यालयाने घायवळला तात्काळ पासपोर्टसाठीचे इतर निकष वापरुन 16 जानेवारी 2020 ला पासपोर्ट मंजुर केला आणि घायवळला पासपोर्ट मिळाला. त्यानंतर 2021 मध्ये निलेश घायवळला पुण्यातील एका दरोड्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता त्याने या पासपोर्टचा आधार घेतला अन् फरार झाला आहे. 2022 मध्ये घायवळला त्या गुन्ह्यात न्यायालयाकडून जामीन मिळाला. तो देताना न्यायालयाने घायवळला त्याचा पासपोर्ट पोलीसांकडे जमा करण्याचे आदेश दिले होते. मात्र घायवळने त्याचा पासपोर्ट जमा केला नव्हता, अशी माहिती मिळाली आहे.

advertisement

निलेश बन्सीलाल गायवळ Not Available

दरम्यान, निलेश बन्सीलाल गायवळ, राहणार गौरी घुमट, आनंदी बाजार, माळीवाडा रोड अहमदनगर असा नाव व पत्ता असलेला घायवळ याने तात्काळ पासपोर्ट सुविधे अंतर्गत पासपोर्ट मिळण्यासाठी पुणे प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाकडे अर्ज सादर केला होता. पत्त्यावर कोतवाली पोलीसांनी पडताळणी केली असता संपर्क होऊ शकला नाही व सदर पत्त्यावर मिळून आला नाही. त्यानंत "Not Available" रिमार्क करून पुणे विभागीय पासपोर्ट कार्यालयास पाठवलं होतं, अशी माहिती समोर आली आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
Pune : निलेश घायवळ स्विझर्लंडला कसा पळाला? पासपोर्ट काढताना मुद्दामून केली एक चूक अन् पोलिसांना दाखवला 'कात्रजचा घाट'
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल