घटनेमुळे, वाघोली परिसरात सध्या दहशतीचे आणि संतापाचे वातावरण पसरले आहे. आई आणि मुलगा- मुलगीच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या घटनेमुळे पोलीस सुद्धा चक्रावून गेले आहेत. 27 जानेवारी (मंगळवार) रोजी पहाटे बायफ रोडवरील वाघोली परिसरातून एका घरातून किंचाळ्या ऐकू आल्या. सोमवारच्या रात्रीपासून घरातून जोरजोरात भांडणाचा आवाज होता. मात्र, शेजाऱ्यांनी काही कारणामुळे वाद होत आहेत, असा विचार करून त्या भांडणाकडे दुर्लक्ष केले. मात्र, मंगळवारी पहाटे शेजारच्यांनी पाहिलेल्या दृश्यांनी सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली. भाऊ आणि बहिण दोघंही रक्ताच्या थारोळ्यात होते, बहिण विचित्र अवस्थेत मदतीची याचना करत होती.
advertisement
11 वर्षांचा साईराज किचनमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता, तर त्याची 13 वर्षांची बहीण धनश्री गंभीर जखमी अवस्थेत मदतीची याचना करत होती. या दोघांच्या शेजारी त्यांची आई, सोनी संतोष जायभाय, हातात रक्ताने माखलेला कोयता घेऊन सुन्न अवस्थेत बसली होती. मूळची नांदेड जिल्ह्यातील कंधारमधील असलेली सोनी सध्या वाघोली पोलिसांच्या ताब्यात आहे. शेजारच्यांना घटनेची माहिती कळताच त्यांनी तात्काळ पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर, साईराजचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. तर, धनश्रीला तातडीने जवळच्या एका रूग्णालयात दाखल केले. डॉक्टरांच्या टीमकडून तिला वाचवण्याचे प्रयत्न केले जात असून सध्या तिची प्रकृती चिंताजनक आहे.
सोनीने आपल्या मुलाची आणि मुलीची हत्या का केली असेल? याचा पोलिसांकडून गुढ उकलले जात आहे. पोलिसांकडून प्राथमिक तपासात दोन शक्यता वर्तवल्या आहेत. सोनी ही मानसिक व्याधीने ग्रस्त असावी आणि त्यातूनच तिने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा अंदाज पोलिसांकडून वर्तवला जात आहे. शिवाय, मुलाची हत्या करण्यासाठी कोयत्याचा वापर करण्यात आला, याचाच अर्थ हे कृत्य तिने रागाच्या भरात केला नसून आधीच ठरवून केलेले असण्याची शक्यता आहे. परंतु जेव्हा सोनीने आपल्या दोन्हीही मुलांची हत्या केली तेव्हा तिचा पती कुठे होता? असा सवाल देखील उपस्थित होतो. दरम्यान, पोलिसांना तिच्या पतीबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही. शिवाय, त्या महिलेने पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली किंवा नेमकं कारण काय, याचा देखील खुलासा केला नाही.
