मात्र, स्वारगेट स्थानकावर पोहोचल्यानंतर त्यांना दागिने गायब असल्याचे लक्षात आले. सुमारे ३ लाख ७८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी शिताफीने लंपास केले. याप्रकरणी महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली आहे. गर्दीचा फायदा घेऊन ही चोरी झाली असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
पुण्यात चाललंय काय! रिक्षाचं बुकिंग रद्द केल्याचा राग; चालकाकडून तरुणाचं अपहरण, मग धक्कादायक कृत्य
advertisement
चोरीची दुसरी घटना कात्रज-आंबेगाव परिसरात घडली. येथे मॉर्निंग वॉक किंवा बसची वाट पाहणाऱ्या नागरिकांना लक्ष्य केले जात आहे. २४ नोव्हेंबर रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास, एक ज्येष्ठ नागरिक जांभुळवाडी रोडवर एसटी बसची वाट पाहत उभे होते. परिसरात अंधार असल्याचा फायदा घेत मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात भामट्यांनी त्यांच्याजवळ येऊन गळ्यातील ६० हजार रुपयांची सोनसाखळी जोरात हिसकावून नेली. याप्रकरणी आंबेगाव पोलिसांनी अज्ञात दुचाकीस्वारांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले जात आहे.
