समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, पानटपरीवर झालेल्या किरकोळ कारणावरून वाद झाला आणि या वादातून खून करण्यात आला आहे. आर्यन साळवे असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. रात्री साडेदहाच्या सुमारास पानटपरीवर ही घटना घडली आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी आरोपी धैर्यशील मोरेला अटक केली आहे. 11 जुलै रोजी ही घटना घडली आहे.
advertisement
पानटपरीवर झाला वाद
मृत आर्यन साळवे हा मूळ नाशिकचा असून पुण्यात तो आपल्या मामाकडे धनकवडी येथे राहत होता. काही दिवसांपूर्वीच त्याला नोकरी लागली होती. एका सलूनमध्ये तो काम करत होता. रात्री जेवण झाल्यानंतर आर्यन पानटपरीवर पान खाण्यासाठी केला होता. तिथेच आरोपी धैर्यशील सिगरेट ओढत उभा होता. माझ्याकडे का पाहतो असे म्हणत दोघांमध्ये वाद झाले. रागाच्या भरात धैर्यशीलने कोयत्याने वार केले . आर्यनने बचावाचा प्रयत्न केला मात्र त्याची बोटे तुटली. डोक्यावर वार झाल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
कात्रजमध्ये मोठी खळबळ
शहरामध्ये गुन्हेगारी कमी होताना दिसत नाही ज्यांचा खून होतोय ते देखील आणि जे खून करताय ते देखील अगदी कमी वयाचे युवक असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. हा खून किरकोळ वादातून झाला आहे की पूर्ववैमनस्य होते याचा तपास पोलीस करत आहे.
