फिर्यादी फहिमुद्दीन मुजिबुद्दीन शेख (४४) यांनी आरोपी हैदर अली शाह याला ७ लाख ७८ हजार रुपयांचे पीओपी मटेरिअल उधारीवर दिले होते. या रकमेचा चेक हैदरने दिला होता, मात्र तो बँकेत बाऊन्स झाला. फहिमुद्दीन यांनी याप्रकरणी कायदेशीर कारवाई करत गुन्हा दाखल केला, ज्याचा राग हैदरच्या मनात होता.
advertisement
भररस्त्यात राडा आणि लूट: २५ जानेवारी रोजी मध्यरात्री पाऊणे एक वाजण्याच्या सुमारास फहिमुद्दीन आणि त्यांचे पार्टनर रोझलिन मोटारसायकलवरून जात असताना, विमाननगरमधील संजय पार्कसमोर आरोपींनी त्यांना अडवले. हत्याराचा धाक दाखवून फहिमुद्दीन यांना बेदम मारहाण करण्यात आली. इतकेच नाही, तर रोझलिन यांच्याकडून २ लाख रुपये आणि त्यांची बँग जबरदस्तीने हिसकावून घेतली. दहशत माजवण्यासाठी आरोपींनी त्यांची मोटारसायकल भररस्त्यात पेटवून दिली.
दोन आरोपींना बेड्या: या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत हैदर अली शाह (३०) आणि रईस पाशा (२५) या दोघांना अटक केली आहे. आरोपींवर मारहाण, दरोडा आणि जाळपोळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर करपे या प्रकरणाचा अधिक तपास करत असून फरार पाच साथीदारांचा शोध घेत आहेत.
