निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे पुणे जिल्ह्यातील जनतेत उत्सुकता आहे. पुण्यातील एकूण आठ मतदारसंघांत काही ठिकाणी दुहेरी तर काही ठिकाणी तिरंगी लढती रंगतदार होत आहेत. काही पक्षांतील अंतर्गत वादामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे, परंतु कोणता उमेदवार निवडून येणार यापेक्षा कोणते सरकार सत्तेत येणार याची अधिक उत्कंठा पुणेकरांमध्ये दिसून येत आहे.
पुणेकरांच्या मते, महायुतीचे सरकार आल्यास त्यांच्या सामाजिक प्रश्नांना अधिक गांभीर्याने हाताळले जाईल. महायुतीच्या नेतृत्वात मेट्रोसह अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांना गती मिळाल्याचे पुणेकर सांगत आहेत. त्यामुळे महायुतीला मत देण्याचे मनोदय त्यांनी व्यक्त केले.
advertisement
महागाई, रोजगार आणि रस्ते सुधारणा हे प्रलंबित प्रश्न असून, हे प्रश्न सोडवणारे सरकार आम्हाला हवे आहे, असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. महायुतीचे सरकार आल्यास त्यांचे प्रश्न सुटतील असा विश्वास पुणेकर व्यक्त करत आहेत.