या गुन्ह्यामध्ये वेदिका कुणाल पंढरपूरकर (वय 41), तिचा पती कुणाल वैजनाथ पंढरपूरकर (वय 42, दोघे रा. कोथरूड) आणि दीपक जनार्दन खडके (वय 65, रा. नाशिक) या तिघांना अटक करण्यात आली आहे. वेदिकाच्या आई आणि भावावरही या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
पोलिसांच्या तपासानुसार, आरोपींनी फसवणुकीची ही रक्कम विविध ठिकाणी वळवली असून एकूण १ हजार १३९ व्यवहार संशयित स्वरूपाचे असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी आरोपींच्या ३९ बँक खात्यांची माहिती मागवली होती, त्यापैकी १३ खात्यांतील व्यवहारांचे पुरावे पोलिसांना मिळाले आहेत.
आरोपींनी फसवणुकीच्या या पैशातून काही मालमत्ता आणि वाहने खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील अटक केलेल्या आरोपींना न्यायालयाने ३ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यापूर्वी पोलीस कोठडीचा हक्क अबाधित ठेवून त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती.
दरम्यान, आरोपींचे वकील यांनी वेदिका पंढरपूरकर आणि दीपक खडके यांच्या तात्पुरत्या जामिनासाठी केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. पोलीस सध्या या कोट्यवधींच्या फसवणुकीचा सखोल तपास करत आहेत.
