TRENDING:

शिवभक्तांसाठी पीएमपीची मोठी भेट; उद्या वढू बुद्रुक दर्शनासाठी पुण्यातून सुटणार जादा बसेस; कुठून अन् किती?

Last Updated:

PMPML Buses Pune : छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त वढू बुद्रूक येथे जाणाऱ्या शिवभक्तांसाठी पीएमपीकडून 14 जादा बस सोडण्यात येणार आहेत. पुण्यातील विविध स्थानकांवरून या बस धावणार आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त उद्या 18 मार्च रोजी वढू बुद्रुक येथील समाधीला भेट देण्यासाठी अनेक संख्येने शिवभक्त जाण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे पीएमपी प्रशासनाने विशेष व्यवस्था केलेली आहे. ही बससेवा नेमकी पुणे शहरातील कोण-कोणत्या भागातून असणार आहे त्याबाबतची सविस्तर माहिती जाणून घ्या.
वढू बुद्रूक जाण्यासाठी पीएमपीची विशेष बस सेवा
वढू बुद्रूक जाण्यासाठी पीएमपीची विशेष बस सेवा
advertisement

'या' प्रमुख स्थानकांवरून मिळणार बस सेवा

उद्या शिवभक्तांचा प्रवास सोयीस्कर होण्यासाठी पीएमपीकडून तब्बल 14 जास्त बसेस चालवण्यात येणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. या बसेस पुणे मनपा भवन तसेच स्वारगेट, हडपसर आणि निगडी या महत्त्वाच्या आगरामधून सुटणार आहेत.

कसं असेल वेळापत्रक?

1)पहिली बस उद्या मनपा भवन ते वढू बुद्रुक या मार्गावर पहाटे 6 वाजता सुटणार आहे आणि त्यानंतर दर 45 मिनिटांनी ते रात्री 8 वाजेपर्यंत ही सेवा शिवभक्तांसाठी उपलब्ध असणार आहे.

advertisement

2) स्वारगेट स्थानकातून पहिली बस 6 वाजून 50 मिनिटांनी निघून सायंकाळी 4.30 वाजेपर्यंत असणार आहे आण तिथं त्या बसेस 1 तास 45 मिनिटांच्या अंतराने उपब्धत असतील.

3) पुण्याच्या हडरसर आगरातून सकाळी पहिली बस 7.45 वाजल्यापासून ते सायंकाळी 5.50 पर्यत असतील तर त्याही बस दीड तासाच्या अंतराने तिथं जातील.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
द्राक्षला 12000 रुपये भाव, लिंबू दरही तेजीत, कांद्याची काय स्थिती? Video
सर्व पहा

4)भोसरीतून सकाळी 6.30 ते संध्याकाळी 4.45 तर निगडीतून सकाळी 7.20 पासून संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत सेवा सुरु राहिल. महत्त्वाचे म्हणजे शिवभक्तांनी गर्दी टाळून सुरक्षित प्रवास करावा असे आवाहन पीएमी प्रशासनाने केले आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
शिवभक्तांसाठी पीएमपीची मोठी भेट; उद्या वढू बुद्रुक दर्शनासाठी पुण्यातून सुटणार जादा बसेस; कुठून अन् किती?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल