पोलीस उपआयुक्त (विशेष शाखा) व कार्यकारी दंडाधिकारी डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये हा मनाई आदेश काढला आहे. आदेशानुसार अशा प्रकारच्या छायाचित्रांमुळे धार्मिक भावना दुखावण्याची, तसेच सार्वजनिक शांततेला बाधा येण्याची शक्यता असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
Pune Traffic : अनंत चतुदर्शीला पुण्याच्या वाहतुकीत मोठा बदल, 17 रस्ते राहणार बंद,वाचा संपूर्ण यादी
advertisement
आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे की, या कालावधीत कोणीही व्यक्ती विसर्जनानंतरच्या मूर्तींचे फोटो अथवा व्हिडिओ समाजमाध्यमांवर टाकल्यास किंवा इतर माध्यमांद्वारे प्रसारित केल्यास त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 223 अन्वये दंडनीय कारवाई करण्यात येईल. म्हणजेच आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांना दंड किंवा शिक्षेस सामोरे जावे लागेल. हा आदेश 4 सप्टेंबर रोजी मध्यरात्री 12.01 वाजल्यापासून लागू होऊन 15 सप्टेंबर रोजी रात्री 12 वाजेपर्यंत अंमलात राहणार आहे. या संपूर्ण कालावधीत पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात सर्व नागरिकांना आदेशाचे पालन करणे बंधनकारक आहे.
पुणे शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा आदेश प्रसिद्ध करून नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी जाहीर करण्यात येणार आहे. तसेच स्थानिक वृत्तपत्रांद्वारेही आदेशाचा प्रसार होणार आहे. यामुळे नागरिकांनी विसर्जनानंतर कोणत्याही प्रकारे मूर्तींचे छायाचित्रण किंवा व्हिडिओ बनवून समाजमाध्यमांवर अपलोड करण्यापासून परावृत्त व्हावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
गणेश विसर्जन हा धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा सोहळा असल्याने त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अनावश्यक वाद निर्माण होऊ नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांत विसर्जनानंतरच्या मूर्तींचे छायाचित्रण समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात पसरवले जात असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे अनेकदा भावनांना धक्का पोहोचल्याचे समोर आले. यंदा अशी परिस्थिती उद्भवू नये, यासाठी पोलीस प्रशासनाने हा कठोर निर्णय घेतला आहे.