पुणे: दहा दिवसांच्या उत्सवानंतर उद्या अनंत चतुर्दशी निमित्त राज्यात सर्वत्र विसर्जन मिरवणुकींचा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. वैभवशाली आणि ऐतिहासिक परंपरा असलेल्या पुण्यातील विसर्जन मिरवणुकांची सुरुवात शनिवारी सकाळी 09.30 वाजता होणार आहे. मानाच्या गणपतीसह शहरातील प्रमुख गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी पुणे शहरात मोठी गर्दी होते. सार्वजनिक गणेश मंडळांची विसर्जन मिरवणूक सुरळीत आणि निर्विघ्न पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून सुद्धा तयारी पूर्ण झाली आहे. पुण्यातील सार्वजनिक गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीची सुरुवात मानाच्या गणपती पासून होते. याच अनुषंगाने यंदा मानाच्या पाचही गणेश मंडळाकडून विसर्जन मिरवणुकीच्या वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत.
advertisement
मानाचा पहिला म्हणजेच पुण्याचे ग्रामदैवत असलेला कसबा गणपतीची मिरवणूक सकाळी 9.30 वाजता लोकमान्य टिळक पुतळ्यापासून सुरुवात होईल. तसेच शहरातील प्रमुख आकर्षण असलेले श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाची विसर्जन मिरवणूक संध्याकाळी चार वाजता बेलबाग चौकातून सुरू होईल.
मानाच्या गणपतींची विसर्जन मिरवणुकीच्या वेळेचं नियोजन कसं असणार?
मानाचा पहिला गणपती कसबा गणपती
- लोकमान्य टिळक पुतळा (सुरुवात): 9.30 वाजता
- बेलबाग चौक: 10.15 वाजता
- कुंटे चौक: 11.45 वाजता
- विजय टॉकीज चौक: 1.40 वाजता
- टिळक चौक: 2.45 वाजता
मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी
- लोकमान्य टिळक पुतळा (सुरुवात): 9.45 वाजता
- बेलबाग चौक: 10.30 वाजता
- कुंटे चौक: 12 वाजता
- विजय टॉकीज चौक: 1.55 वाजता
- टिळक चौक: 3 वाजता
मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम
- लोकमान्य टिळक पुतळा (सुरुवात): 10 वाजता
- बेलबाग चौक: 11 वाजता
- कुंटे चौक: 12.45 वाजता
- विजय टॉकीज चौक: 2.30 वाजता
- टिळक चौक: 3.30 वाजता
मानाचा चौथा गणपती तुळशीबाग मंडळ
- लोकमान्य टिळक पुतळा (सुरुवात): 10.15 वाजता
- बेलबाग चौक: 11.30 वाजता
- कुंटे चौक: 1.30 वाजता
- विजय टॉकीज चौक: 3 वाजता
- टिळक चौक: 4 वाजता
मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा
- लोकमान्य टिळक पुतळा (सुरुवात): 10.30 वाजता
- बेलबाग चौक: 12 वाजता
- कुंटे चौक: 2 वाजता
- विजय टॉकीज चौक: 3.30 वाजता
- टिळक चौक: 4.30 वाजता
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती
- बेलबाग चौक (सुरुवात): 4 वाजता
- गणपती चौक: 4.55 वाजता
- कुंटे चौक: 6 वाजता
- विजय टॉकीज चौक: 6.30 वाजता
- टिळक चौक: 7.30 वाजता
अखिल मंडई मंडळ
- बेलबाग चौक (सुरुवात): 7 वाजता
- गणपती चौक: 7.25 वाजता
- कुंटे चौक: 8.30 वाजता
- विजय टॉकीज चौक: 9.20 वाजता
- टिळक चौक: 11.25 वाजता
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ ट्रस्ट
- बेलबाग चौक (सुरुवात): 6.30 वाजता
- गणपती चौक: 6.55 वाजता
- कुंटे चौक: 8 वाजता
- विजय टॉकीज चौक: 9.40 वाजता
- टिळक चौक: 10.45 वाजता