खरं तर, वनराज आंदेकर यांच्या हत्येला एक वर्ष पूर्ण झाल्यामुळे पुण्यात काहीतरी मोठं कांड घडणार, याची टीप पोलिसांना आधीच मिळाली होती. पुणे पोलिसांनी भारती विद्यापीठ परिसरातील हत्येचा एक कट उधळून लावला होता. पण शुक्रवारी रात्री आंदेकर टोळीने आयुष कोमकरवर गोळ्या झाडून वनराजच्या हत्येचा बदला घेतला आहे. या हत्येची स्क्रीप्ट गेल्या वर्षी वनराज आंदेकर यांच्या अंत्यविधालाच लिहिल्याचं सांगितलं जातंय.
advertisement
वनराजच्या अंत्यविधीलाच लिहिली स्क्रीप्ट
गेल्या वर्षीय १ सप्टेंबर रोजी वनराज आंदेकर याचा नाना पेठेतील डोके तालीम परिसरात कोयत्याने वार करून आणि गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. या प्रकरणात सोम्या गायकवाड, गणेश कोमकर आणि इतर आरोपी होते. हत्येची घटना उघडकीस येताच आंदोकर टोळी आक्रमक झाली होती. ‘वनराज’च्या अंत्यविधीवेळी आंदेकर टोळीच्या सदस्यांनी शस्त्रपूजन करून खुनाचा बदला घेण्याची शपथ घेतली होती. ही माहिती पुणे शहर पोलीस दलातील अधिकाऱ्यांना आणि गुन्हे शाखेलाही होती. वनराजच्या अंत्यविधीलाच मारेकऱ्यांच्या हत्येची स्क्रीप्ट लिहिली होती. पोलिसांना याची आधीपासून माहिती असूनही पोलिसांना हा गुन्हा रोखता आला नाही.
अलीकडेच १ सप्टेंबरला ‘वनराज’च्या खुनाला एक वर्ष पूर्ण होत असताना, भारती विद्यापीठ परिसरात आंदेकर टोळीने एकाच्या खुनाचा कट रचला होता. तो कट भारती विद्यापीठ पोलिसांनी उधळून लावला. मात्र, नाना पेठेतील कट पोलिसांना उधळून लावता आला नाही. आंदेकर टोळीने गणेश कोमकरच्या मुलाचा खून केला आहे. पण वनराजच्या हत्येत कोमकरच्या मुलाचा काही संबंध होता का? त्याला कशामुळे मारलं? याची माहिती अद्याप समोर आली नाही. पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.