गौतमी पाटील म्हणाली, ज्या वेळी अपघात झाला त्यावेळी मी गाडीतच नव्हते, मला उगाच बदनाम केलं जात आहे. विनाकारण मला या सगळ्या प्रकरणात ट्रोल केलं गेलं. अपघाताच्या वेळी गाडी ड्रायव्हर चालवत होता. ज्यावेळी मला अपघाताची माहिती मिळाली त्यावेळी मी माझे जे मानलेले भाऊ आहे त्यांना तिथे पाठवले अन् मदतीचा हात पुढे केला. कारण मी देखील गरिबीतूनच पुढे आले आहे. मात्र रिक्षाचालक कुटुंबीयांनी मदत नाकारली आणि आम्ही जे काही असेल ते कायदेशीर करु असे सांगण्यात आले.
advertisement
मी पोलिसांनी पूर्ण सहकार्य केले: गौतमी पाटील
गौतमी पाटील म्हणाली, रिक्षाचालक कुटुंबाने मदत नाकारली, त्यानंतर त्यांनी कायदेशीर चालणार असे सांगितले. त्यानंतर मी देखील शांत बसले. मात्र त्यानंतर माझी विनाकारण बदनाम केली जात आहे. मी अपघातावेळी खासगी कामासाठी इतर ठिकाणी होते. मी पोलिसांनी पूर्ण सहकार्य केले असून त्यांना मी त्यावेळी कुठे होते?, गाडीची कागदपत्रे सगळी माहिती दिली आहे.
मला कायमच ट्रोल केलं जातय: गौतमी पाटील
अपघात प्रकरणानंतर मला ट्रोल केलं जात आहे. मी एखादी गोष्ट चांगली केली तर ट्रोल केले जातं. मला विनाकारण टार्गेट केले जात आहे. मी आता कायदेशीर पद्धतीने उत्तर देणार आहे. माझा या गोष्टीशी काही संबंध नाही. मला कायमच ट्रोल केलं जात असून कोणत्याही गोष्टीसाठी मला कायम दोष दिला जातो, असे गौतमी पाटील म्हणाली
पुणे पोलिसांची गौतमी पाटीलला क्लीन चीट
पुणे पोलिसांनी सखोल चौकशी करून गौतमी पाटीलला क्लीन चीट दिली आहे. पोलिसांनी तपासात स्पष्ट केलं आहे की, अपघाताच्या वेळी गौतमी पाटील घटनास्थळी किंवा संबंधित वाहनात नव्हती. या प्रकरणी पुणे पोलिसांनी 100 हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले. साक्षीदारांचे जबाब नोंदवले आणि वाहनचालकांच्या हालचालींचा बारकाईने मागोवा घेतला. त्यानंतर सादर करण्यात आलेल्या अंतिम अहवालात गौतमी पाटीलचा कोणताही सहभाग नसल्याचं स्पष्ट करण्यात आले आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरात 30 सप्टेंबर २०२५ रोजी पहाटेच्या सुमारास हा अपघात घडला होता. गौतमी पाटीलच्या मालकीच्या असलेल्या कारने रस्त्यावर उभ्या असलेल्या रिक्षाला धडक दिली होती. या अपघातात रिक्षाचालक सामाजी विठ्ठल मरगळे जखमी झाले होते. अपघातानंतर गाडीतील लोक थेट उतरून निघून गेले आणि रिक्षाचालक रस्त्यावर गंभीर अवस्थेत पडून राहिला. स्थानिकांनी रिक्षाचालकाला तत्काळ रूग्णालयात दाखल केले. मात्र, काही वेळातच अपघातग्रस्त गाडी तिथून टोईंग व्हॅनद्वारे नेण्यात आली.जखमी रिक्षाचालकाच्या कुटुंबीयांनी फक्त कारवाई नाही, तर गौतमी पाटीलवर त्वरित अटक करण्याची मागणी केली होती.