नेमकी घटना काय?
सुजल हा हिंजवडीतील एका नामांकित खासगी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत होता. कामावर असताना तो कंपनीच्या कॅन्टीनमधील स्वच्छतागृहात गेला. तिथे त्याने मोबाईल चार्जरच्या केबलचा वापर करून गळफास घेतला. बराच वेळ तो बाहेर न आल्याने हा प्रकार उघडकीस आला.
advertisement
कठोर पाऊल उचलण्यापूर्वी सुजलने आपल्या नातेवाईकांना मोबाईलवर एक मेसेज पाठवला होता. या मेसेजमध्ये त्याने ऑनलाइन सट्टा आणि बेटिंगच्या आहारी गेल्याचे कबूल केले होते. ऑनलाइन जुगारात मोठ्या प्रमाणावर पैसे हरल्यामुळे त्याच्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला होता. या आर्थिक ओझ्याखाली दबल्या गेल्यामुळे आणि नैराश्यातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे पोलिसांनी सांगितले.
वाढती चिंतेची बाब: तरुण पिढी ऑनलाइन गेमिंग आणि सट्टेबाजीच्या विळख्यात अडकत चालल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. उच्चशिक्षित आणि चांगल्या पगाराची नोकरी असतानाही केवळ जुगाराच्या व्यसनामुळे एका २४ वर्षीय तरुणाचा अंत झाल्याने आयटी क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. हिंजवडी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
