नेमकं काय होतं प्रकरण?
पगारवाढ न झाल्याचा तसेच थकीत पगार न मिळाल्याच्या कारणावरून एका आयटी ॲडमिनने थेट निर्णयच घेतला. महाविद्यालयाची संपूर्ण डिजिटल यंत्रणा बंद पाडली. हा धक्कादायक प्रकार 9 ते 10 जानेवारी दरम्यान आळंदीतील देहूफाटा परिसरात असलेल्या एमआयटी अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगमध्ये घडला.
Pune Crime: शेतात लघुशंका केल्यानं सटकली; मावळमधील तिघांचं व्यक्तीसोबत धक्कादायक कृत्य
advertisement
या प्रकरणी एमआयटी अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगचे कार्यकारी संचालक महेश देवेंद्र गौडा यांनी 10 जानेवारीला दिघी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार मिलिंद गोविंद असमार याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मिलिंद असमार हा संबंधित महाविद्यालयात कॉम्प्युटर व सिस्टिम प्रशासक म्हणून कार्यरत होता. पगारासंदर्भातील वादातून त्याने महाविद्यालयाच्या डिजिटल सिस्टिममध्ये हस्तक्षेप करून ती बंद पाडल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान
आरोपी आयटी प्रशासकाने स्वतःच्या तसेच आयटी विभागातील कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीसाठी महाविद्यालयाकडे अर्ज केला होता. मात्र व्यवस्थापनाकडून या मागण्या मान्य करण्यात आल्या नव्हत्या. त्यानंतर संबंधित कर्मचारी सलग तीन महिन्यांपर्यंत कामावर अनुपस्थित राहिला.
महाविद्यालयाने पगार रोखल्यामुळे संतप्त झालेल्या आरोपीने कोणतीही अधिकृत परवानगी न घेता महाविद्यालयाच्या वेबसाईटचा सुपर अॅडमिन पासवर्ड बदलल्याचा आरोप आहे. या कृतीमुळे महाविद्यालयाची डिजिटल प्रणाली आणि सॉफ्टवेअर सेवा ठप्प झाली असून त्याचा थेट फटका विद्यार्थ्यांना बसल्याचे समोर आले आहे.






