दिवसाला लाखो महिला प्रवासी
पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए कार्यक्षेत्रात दररोज अंदाजे 10 ते 11 लाख प्रवासी पीएमपीच्या बसेसमधून प्रवास करतात. यापैकी तब्बल 4 ते 5 लाख महिला प्रवासी आहेत. महिलांना सुरक्षित, सोयीस्कर आणि किफायतशीर सेवा देण्यावर पीएमपीचा नेहमी भर राहिला आहे. याच पार्श्वभूमीवर राखी पौर्णिमेनिमित्त महिला प्रवाशांना विशेष मान देण्यासाठी ही लकी ड्रॉ योजना राबवली जात आहे.
advertisement
PMP: बस पाससाठी रांगा लागणारच नाहीत! प्रवाशांसाठी अभिनव उपक्रमाची सुरुवात
असा घ्या योजनेत सहभाग
या योजनेत सहभागी होण्यासाठी महिला प्रवाशांनी बसमध्ये लावलेला क्यूआर कोड स्कॅन करून ऑनलाइन फॉर्म भरावा लागेल. स्मार्टफोन नसल्यास वाहकाकडून कुपन घेऊन आवश्यक माहिती भरून ते बसमध्ये ठेवलेल्या बॉक्समध्ये जमा करता येईल. एका तिकिटासाठी एकाच मोबाईल नंबरवरून केवळ एकदाच सहभाग नोंदवता येईल आणि त्या दिवशी प्रत्यक्ष प्रवास करणे आवश्यक असेल. तिकीट प्रिंटेड, दैनंदिन पास, यूपीआय किंवा मोबाइल अॅपवरून घेतलेले असू शकते.
17 भाग्यवान महिलांना बक्षीस
संगणकीकृत सोडतीद्वारे एकूण 17 महिला विजेत्यांची निवड केली जाणार आहे. प्रत्येक विजेत्याला आकर्षक पैठणीसह एक महिन्याचा मोफत बस पास प्रदान केला जाणार आहे. या योजनेत पीएमपीचे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना सहभागी होता येणार नाही. या उपक्रमाची संकल्पना पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांनी मांडली असून, प्रशासनाकडून विजेत्यांची नावे आणि सोडतीची तारीख लवकरच जाहीर केली जाणार असल्याचे सांगितले आहे.






