हा मुलगा कोंढव्यातील बधेनगर भागात राहणारा आहे. सोमवारी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास तो शाळेतून घरी जाण्यासाठी निघाला होता. महर्षीनगर भागातील पुजारी उद्यानाजवळ असलेल्या पीएमपी बस थांब्यावर तो थांबला असताना अचानक एक अनोळखी तरुण तिथे आला. त्याने या मुलाकडे रागाने बघितलं आणि कोणतंही कारण नसताना त्याच्याजवळ असलेल्या शस्त्राने मुलाच्या हातावर अचानक वार केला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मुलाला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
advertisement
स्टेशनपासून घरापर्यंत रिक्षा केली, परतत असताना 34 वर्षीय महिलेसोबत भयंकर घडलं, डोंबिवलीतील घटना
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. गेल्या काही वर्षांपासून शहरात शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये क्षुल्लक कारणावरून हल्ले करण्याच्या घटना वाढल्या आहेत. गेल्या वर्षीही भवानी पेठेतील एका शाळेसमोर अशाच प्रकारे वादातून एका मुलावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आला होता. या घटनेची गांभीर्यानं दखल घेत पोलीस उपनिरीक्षक बी. पी. शिरसट या प्रकरणाचा तपास करत आहेत. आरोपी नेमका कोण होता आणि त्यांच्यात झालेला वाद किती जुना आणि नेमका काय होता, या दिशेने पोलीस तपास सुरू आहे.
