स्टेशनपासून घरापर्यंत रिक्षा केली, परतत असताना 34 वर्षीय महिलेसोबत भयंकर घडलं, डोंबिवलीतील घटना

Last Updated:

Shocking Crime Dombivli : डोंबिवलीत एका रिक्षावाल्याने प्रवासादरम्यान महिलेला पाण्यातून औषध पाजून झोपेत केली आणि तिच्या पर्समधून सोन्याचे कानातले आणि रोकड चोरी केली. रामनगर पोलिस सीसीटीव्ही तपासून आरोपी रिक्षावाल्याचा शोध घेत आहेत.

News18
News18
डोंबिवली : डोंबिवलीत प्रवासादरम्यान महिलेसोबत धक्कादायक घटना घडली आहे. जिथे पाण्यातून गुंगीचे औषध पाजून त्यांची लूट करण्यात आलेली आहे. सध्या या प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली गेली आहे.नेमकं ही घटना कधीची आहे आणि कशा प्रकारे ही घटना घडली त्याबाबत सविस्तर घटनाक्रम जाणून घ्या.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला कल्पना पेडणेकर (वय34) या डोंबिवलीत वास्तव्यास आहेत. 22 नोब्हेंबर रोजी त्या कल्याणमध्ये काही कामानिमित्ताने गेल्या होत्य. काम पूर्ण केल्यानंतर रात्री साधारण 11 वाजता त्यांनी ट्रेनने जाण्याऐवजी कल्याण स्टेशनवरुन रिक्षाने जायचे ठरवले. त्यानुसार त्या एका रिक्षात बसून घरी परतत होत्या. प्रवासादरम्यान त्यांना तहान लागली आणि त्यांनी रिक्षावाल्याकडे पाणी मागितलं. रिक्षावाल्याने त्यांना पाण्याची बाटली दिली. पाणी प्याल्यानंतर कल्पना यांना अचानक गुंगी येऊन झोप लागली.
advertisement
ही संधी साधून रिक्षावाल्याने त्यांच्या पर्समधून सोन्याचे कानातले झुमके आणि रोकड काढून घेतली. रात्री घरी पोहोचल्यावर कल्पना यांनी पर्स उघडून पाहिला. त्यात 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातले झुमके आणि 6 हजार रुपयांची रोकड गायब होती.कल्पना यांना संशय आला की रिक्षावाल्याने प्रवासादरम्यानच ऐवज काढला आहे. त्यांनी तक्रार नोंदवण्यासाठी रामनगर पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली.
advertisement
वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश जवादवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून रिक्षावाल्याचा शोध सुरु केला आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रामनगर पोलिसांनी अज्ञात रिक्षावाल्याविरुद्ध भारतीय दंडसंहितेच्या कलम 303(2) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
view comments
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
स्टेशनपासून घरापर्यंत रिक्षा केली, परतत असताना 34 वर्षीय महिलेसोबत भयंकर घडलं, डोंबिवलीतील घटना
Next Article
advertisement
Election Commission On Local Body Election: राजकीय नेत्यांकडून टीकेचा भडिमार, निवडणूक आयोगानं स्पष्टचं म्हटले, 'त्यांना काय वाटतं यापेक्षा...'
राजकीय नेत्यांकडून टीकेचा भडिमार, निवडणूक आयोगानं स्पष्टचं म्हटले, 'त्यांना काय
  • राजकीय नेत्यांकडून टीकेचा भडिमार, निवडणूक आयोगानं स्पष्टचं म्हटले, 'त्यांना काय

  • राजकीय नेत्यांकडून टीकेचा भडिमार, निवडणूक आयोगानं स्पष्टचं म्हटले, 'त्यांना काय

  • राजकीय नेत्यांकडून टीकेचा भडिमार, निवडणूक आयोगानं स्पष्टचं म्हटले, 'त्यांना काय

View All
advertisement