दिप्ती अचानक मोठ्याने रडू लागली...
दीप्ती मगर चौधरी या विवाहितेचं नाव असून तिनं इंजीनियरिंगचं शिक्षण पूर्ण केलं. लग्नानंतर काही वर्ष चांगली गेल्यानंतर सासरच्या लोकांनी आपले खरे रंग दाखवले. दीप्तीच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, मी दिप्तीला तू खूपचं नाराज दिसत आहे असं विचारलं तेव्हा तिने मोठ्याने रडू लागली, असं तिच्या वडिलांनी सांगितलं. त्यावेळी विश्वासात घेऊन तिला सगळा घटनाक्रम विचारला तेव्हा तिने सांगितलं की, माझ्या इच्छेविरुद्ध माझा गर्भपात केला गेला. आधीच मुलगी असल्याने सासू आणि नवऱ्याने बळजबरीने चाचणी करायला लावली. त्यावेळी तपासणीत दुसरी देखील मुलगी असल्याचं दिसून आलं. त्यावेळी सासूने जबरदस्तीने माझा गर्भपात करून घेतला, अशी कैफियत दिप्तीने वडिलांसमोर मांडली.
advertisement
आमच्या वंशाला दिवा हवाय
मुलाच्या हव्यासापोटी दिप्तीवर आपल्याच बाळाच्या विरोधात जाण्यासाठी दबाव टाकला जात होता. आम्हाला आमच्या वंशाला दिवा हवा आहे, तू तपासणी करणार नसशील तर आमच्या घरातून चालती हो, असं माझ्या सासुने मला म्हटलं होतं. तसेच घरी काही सांगू नको, असा दबाव देखील टाकला होता, असं दिप्तीने वडिलांना सांगितलं. मात्र, मी तिला समजवून शांत केलं अन् तिला समजवून सांगितलं, असं तिच्या वडिलांनी म्हटलं आहे.
50 तोळे सोने, 25 लाख रुपये
दरम्यान, दिप्ती हिला चारचाकी गाडी घेण्यासाठी माहेरून हुंड्याची मागणी करून वेळोवेळी पैसे आणण्यासाठी मागणी केली, पैसे घेवून त्रास दिला. या प्रकरणी सासू आणि पतीला पोलिसांनी अटक केली आहे. 2019 ला यांचा विवाह झाला होता लग्नामध्ये 50 तोळे सोने देण्यात आले होते. तरी देखील तुला काही करताच येत नाही. तुला जमतंच नाही, असा त्रास तिला दिला जात होता. मुलीचा संसार चांगला व्हावा यासाठी तिच्या सासरच्यांना एकदा 10 लाख रुपये कॅश, गाडी घेण्यासाठी 25 लाख रुपये देण्यात आले होते.
