या अपघातानंतर राहुल यांना तातडीने प्राथमिक उपचारांसाठी जवळच्या दवाखान्यात नेण्यात आले. मात्र परिस्थितीचे गांभीर्य ओळखून डॉक्टरांनी त्यांना सूक्ष्म रक्तवाहिन्या जोडण्याची सुविधा असलेल्या मोठ्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. वेळ न घालवता त्यांना वानवडीच्या इनामदार रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे सुघटनशल्यचिकित्सक डॉ. अभिषेक घोष आणि त्यांच्या पथकाने 'मायक्रोव्हॅस्क्युलर थंब रिप्लांटेशन' ही आव्हानात्मक शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. सलग पाच तास चाललेल्या या प्रक्रियेत मायक्रोस्कोपचा वापर करून केसासारख्या अतिशय बारीक रक्तवाहिन्या पुन्हा एकमेकांना जोडण्यात आल्या. रक्तवाहिन्यांसोबतच हाताच्या नसा आणि इतर मऊ उतींचीही दुरुस्ती करण्यात आली, जेणेकरून अंगठ्यामध्ये पुन्हा रक्ताभिसरण सुरू होईल.
advertisement
Pune News: लग्नाची एवढी घाई! खोटं वय सांगून आळंदीत उरकला विवाह, सासऱ्याचीच जावयाविरोधात पोलिसांत धाव
डॉक्टरांच्या या परिश्रमानंतर तुटलेला अंगठा यशस्वीपणे जोडला गेला असून तो आता जीवंत झाला आहे. अशा प्रकारच्या अपघातात तुटलेला अवयव सुरक्षितपणे आणि वेळेत रुग्णालयात पोहोचवणे अत्यंत महत्त्वाचे असते. दुचाकीची चेन साफ करताना इंजिन सुरू ठेवणे किती धोकादायक ठरू शकते, याचे हे एक ज्वलंत उदाहरण आहे. राहुल जाधव यांच्यावर आता पुढील उपचार सुरू असून, फिजिओथेरपीनंतर त्यांच्या अंगठ्याची हालचाल पुन्हा सामान्य होण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली आहे. वेळेवर मिळालेले उपचार आणि आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान यांच्या संगमामुळे राहुल यांना त्यांचे बोट परत मिळाले आहे.
