TRENDING:

Pune Metro Update : पुणेकरांसाठी खुशखबर! हिंजवडी मेट्रोची धाव आता 20 किलोमीटरने वाढली; नवीन स्टेशन्स कोणती? वाचा सविस्तर

Last Updated:

Hinjewadi Metro Extended Update : हिंजवडीतील मेट्रो प्रकल्पाला मोठी गती मिळणार आहे. मेट्रो 20 किलोमीटर जादा धावणार आहे. मात्र या मेट्रोचा मार्ग कसा असणार आहे त्या बद्दल सविस्तर जाणून घेऊयात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : पुण्यातील मेट्रो प्रकल्पाला गती देण्यासाठी आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. मेट्रो विस्तारीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यातील शिवाजीनगर–कोंढवा मार्गिका या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी लवकरच सल्लागारांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
News18
News18
advertisement

येत्या तीन महिन्यांत या मार्गिकेचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार होऊन तो मंजुरीसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठवला जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी दिली आहे.

कोंढवा तसेच येवलेवाडी परिसरात वाढत्या वाहतूक कोंडीचा मुद्दा नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात आमदार योगेश टिळेकर यांनी उपस्थित केला होता. त्याचबरोबर या भागातील नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. परिणामी शिवाजीनगर ते कोंढवा या 20 किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गिका प्रस्तावाला गती मिळाली आहे.

advertisement

हिंजवडी ते शिवाजीनगर अशी सुरू होणारी मेट्रो मार्गिका या प्रकल्पाच्या विस्तारामुळे थेट कोंढवा, एनआयबीएम रोड आणि येवलेवाडीपर्यंत पोहोचणार आहे. या भागात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात शहरीकरण झाल्याने सार्वजनिक वाहतुकीची सोय हा मोठा प्रश्न बनला आहे. मेट्रोचे जाळे विस्तारले तर हजारो प्रवाशांना दररोजचा प्रवास अधिक सोयीस्कर होईल.

दरम्यान हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रो मार्गही लवकरच सुरू होणार असल्याचे हर्डीकर यांनी सांगितले. या मार्गासोबतच महामेट्रोकडून शहरातील इतर काही महत्त्वाच्या मार्गिकाही प्रस्तावित आहेत. खडकवासला, हडपसर, स्वारगेट आणि खराडीला जोडणाऱ्या मेट्रो लाईनना राज्य सरकारकडून मान्यता मिळाली आहे. याशिवाय प्रस्तावित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ लक्षात घेऊन हडपसर ते सासवड या लाइन–4 च्या विस्ताराचाही विचार सुरू आहे.

advertisement

या सर्व प्रकल्पांमुळे पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला नवे बळ मिळेल. रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांना वेळ वाचवता येईल. त्याचबरोबर पर्यावरणाच्या दृष्टीनेही हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे, असेही हर्डीकर यांनी नमूद केले. शिवाजीनगर–कोंढवा मार्गिकेच्या सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, डीपीआर तयार झाल्यानंतर मंजुरी मिळाल्यावर प्रत्यक्ष कामांना गती मिळणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
Pune Metro Update : पुणेकरांसाठी खुशखबर! हिंजवडी मेट्रोची धाव आता 20 किलोमीटरने वाढली; नवीन स्टेशन्स कोणती? वाचा सविस्तर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल