पुणे : पुणेकरांसाठी एक चांगली बातमी आहे. वाहतूक कोंडी, मोडकळीस आलेल्या बसेसने त्रस्त झालेल्या पुणेकरांसाठी मेट्रोच्या विस्ताराला केंद्रीय मंत्रिमंडळाचा हिरवा कंदील दिला आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली माहिती दिली आहे. यामुळे शहराच्या विकासाला मोठी मदत होणार असून 9 हजार 880 कोटी रुपयाचा प्रोजेक्टला कॅबीनेटने मंजुरी दिली आहे.
आझादी का अमृत महोत्सवाच्या काळात पुणेकरांना केंद्र सरकारकडून मोठी भेट दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आज पुणे मेट्रो रेल प्रकल्पाच्या फेज-2 ला मंजुरी दिली आहे. या फेजमध्ये लाईन-4 खराडी–हडपसर–स्वारगेट–खडकवासला आणि लाईन-4A नळ स्टॉप–वॉरजे–माणिक बाग मार्गाचा समावेश असणार आहे.
advertisement
कुठून कुठे जाणार मार्ग?
31.636 किमी लांबीच्या या दोन मेट्रो मार्गांवर एकूण 28 उंच स्टेशन उभारले जाणार आहेत. अंदाजे 9,857.85 कोटी खर्चाचा हा प्रकल्प पुढील पाच वर्षांत पूर्ण करण्यात येणार असून, केंद्र व राज्य शासनासोबत आंतरराष्ट्रीय निधी संस्थांचाही सहभाग असेल. या नवीन मार्गांमुळे खराडी आयटी पार्क, हडपसर औद्योगिक क्षेत्र, स्वारगेट, वारजे, माणिक बाग यांसारख्या व्यावसायिक, शैक्षणिक व निवासी भागांना मोठी जोड मिळेल. वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असून दैनंदिन पर्याय अधिक वेगवान व पर्यावरणपूरक होणार आहेत.
पुणे मेट्रोने आता 100 किमीचा टप्पा पार केला
2038 पर्यंत या मार्गांवर जवळपास 7 लाखांपर्यंत प्रवासी सेवा घेतील, तर 2058 मध्ये हा आकडा 11.7 लाखांहून अधिक होणार असल्याचा अंदाज आहे. पुण्याच्या भविष्यातील वाहतूक रचनेला नव्या आकार देणारा हा निर्णय ठरणार आहे. पुणे मेट्रोच्या जाळ्याने आता 100 किमीचा टप्पा पार केला आहे.आणि यानंतर शहराची वाहतूक व्यवस्था एका नव्या युगात प्रवेश करणार आहे.
अंदाजे 9,857.85 कोटी खर्चाचा हा प्रकल्प
पुण्यातील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस तीव्र स्वरुप धारण करत आहे. त्यातच परिवहन सेवेतील बसेसची दुरावस्था झाली असल्याने जनतेचे दररोज हाल होत असतात.त्यामुळे पुण्यातही मेट्रोच्या दुसऱ्या फेजची मागणी गेल्या काही दिवसांपासून जोर धरत होती. ती पूर्ण झाली आहे. अंदाजे 9,857.85 कोटी खर्चाचा हा प्रकल्प पुढील पाच वर्षांत पूर्ण करण्यात येणार आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने पुणे हे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर असून येथील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी नवनवीन प्रकल्प उभे करण्यात येत आहेत. पुण्यात मेट्रोचे जाळे तयार करण्यासाठी विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत.
हे ही वाचा :
