पाच दिवसांपूर्वीच्या वादाचा सूड
मिळालेल्या माहितीनुसार, प्रतिभा शरद पवार (वय ४५, रा. भुकुम) या बुधवारी आपल्या घरासमोर नेहमीप्रमाणे भांडी घासत होत्या. त्यावेळी त्यांचा दीर भरत निवृत्ती पवार (वय ५८) तिथे आला. प्रतिभा आणि भरत यांच्यात पाच दिवसांपूर्वी काही कारणावरून कडाक्याचे भांडण झाले होते. त्या भांडणाचा राग भरतच्या मनात होता. सूड घेण्याच्या उद्देशानेच तो तिथे पोहोचला.
advertisement
पुणे हादरलं! अंडाभुर्जी खाताना तोंडाकडे पाहिल्याचा राग; मारहाणीत 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू
गरम पाण्याची बादली ओतून केला हल्ला
भरतने प्रतिभा यांना पाहताच शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाद वाढत असतानाच भरतने क्रूरतेची सीमा ओलांडली. त्याने आपल्या हातातील गरम पाण्याची बादली थेट प्रतिभा यांच्या अंगावर ओतली. उकळत्या पाण्यामुळे प्रतिभा यांच्या पायांना गंभीर दुखापत झाली असून त्या वेदनेनं विव्हळत होत्या. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली.
पोलीस कारवाई
याप्रकरणी प्रतिभा पवार यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. पोलिसांनी भरत पवार याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. घरगुती वादातून घडलेल्या या हिंसक घटनेमुळे भुकुम परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
