सुरक्षारक्षकच निघाला चोर: अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव व्यासमुनी श्यामनैन पाल (वय २६, रा. उत्तमनगर, मूळ रा. उत्तर प्रदेश) असे आहे. आरोपी पाल हा संबंधित बांधकाम व्यावसायिक कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून कामाला होता. ज्या सोसायटीच्या संरक्षणाची जबाबदारी त्याच्यावर होती, तिथेच त्याने डल्ला मारला.
९६ फायर नोजल लंपास: मिळालेल्या माहितीनुसार, ८ ते ११ जानेवारी २०२६ या कालावधीत पाल याने सोसायटीच्या आवारातील तब्बल ९६ फायर नोजल (अग्निरोधक साहित्य) हळूच चोरून नेले. सोसायटीच्या तपासणी दरम्यान इतक्या मोठ्या प्रमाणात साहित्याची कमतरता असल्याचे कंपनीच्या पर्यवेक्षकांच्या लक्षात आले. संशय बळावल्याने त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली आणि फिर्याद दाखल केली.
advertisement
पुण्यातील सोनालीनं गोड बोलून घेतली साडेतीन कोटींची औषधं, मग केलं असं कांड, औषध वितरक शॉक
नांदेड सिटी पोलिसांनी तपास चक्रे फिरवत तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे व्यासमुनी पाल याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने हे साहित्य चोरल्याची कबुली दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक अमृता पाटील या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, चोरलेले साहित्य आरोपीने कुठे विकले किंवा आणखी कोणाचे यात सहकार्य लाभले, याचा शोध घेतला जात आहे.
सोसायटी आणि महत्त्वाच्या इमारतींमध्ये नेमलेले सुरक्षारक्षकच जर अशा गुन्ह्यात सामील होत असतील, तर रहिवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
