TRENDING:

'तो' एक कॉल उचलणं पडलं महागात; पुण्यातील सेवानिवृत्त महिलेची आयुष्यभराची जमापुंजी क्षणात गायब

Last Updated:

पुणे शहरातील नऱ्हे परिसरात एका सेवानिवृत्त ज्येष्ठ महिलेची १० लाख ५५ हजार रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : पुणे शहरातील नऱ्हे परिसरात एका सेवानिवृत्त ज्येष्ठ महिलेची सायबर चोरट्यांनी १० लाख ५५ हजार रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बँक खात्याची गोपनीय माहिती मिळवून चोरट्यांनी महिलेच्या कष्टाची पुंजी लंपास केली असून, याप्रकरणी नऱ्हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिलेची १० लाख ५५ हजार रुपयांची फसवणूक (AI Image)
महिलेची १० लाख ५५ हजार रुपयांची फसवणूक (AI Image)
advertisement

नेमकी घटना काय?

नऱ्हे येथील मानाजीनगर परिसरात राहणाऱ्या ६६ वर्षीय ज्येष्ठ महिलेला सायबर चोरट्यांनी मोबाईलवर संपर्क साधला. महिलेचा मोबाईल क्रमांक तिच्या बँक खात्याशी जोडलेला होता, याचाच फायदा चोरट्यांनी घेतला. चोरट्यांनी अत्यंत शिताफीने बोलून महिलेच्या बँक खात्याशी संबंधित अत्यंत गोपनीय माहिती पदरात पाडून घेतली.

मोबाईल हॅक करून डल्ला: सायबर चोरट्यांनी केवळ माहितीच घेतली नाही, तर महिलेचा मोबाईलही हॅक केला. त्यानंतर बँक खात्यातून तब्बल १० लाख ५५ हजार रुपये अन्य खात्यात वळवून घेतले. खात्यातून मोठी रक्कम अचानक गायब झाल्याचे लक्षात येताच महिलेने पोलिसांकडे धाव घेतली.

advertisement

याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक आत्माराम शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली नऱ्हे पोलीस अधिक तपास करत आहेत. तांत्रिक पुराव्यांच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

घरात घुसून चोरी 

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनचे दर वाढले, कापूस आणि तुरीला आज काय मिळाला भाव? एका क्लिकवर चेक करा
सर्व पहा

पुणे शहरात गुन्हेगारांचे धाडस वाढले असून, चोरीच्या एका घटनेनं खळबळ उडाली आहे. पुण्यातील अत्यंत सुरक्षित मानल्या जाणाऱ्या कोरेगाव पार्कमधील गल्ली क्रमांक ५ मध्ये एका तरुणीवर प्राणघातक हल्ला करून लुटमार करण्यात आली. दोन अज्ञात चोरट्यांनी तरुणीच्या घराचा दरवाजा वाजवून आत प्रवेश केला. तिने दरवाजा उघडताच चोरट्यांनी तिला चाकूचा धाक दाखवला आणि जीवे मारण्याची धमकी दिली. चोरट्यांनी तिला कपाट उघडायला लावून त्यातील ११ लाख ४० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने बळजबरीने काढून घेतले

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
'तो' एक कॉल उचलणं पडलं महागात; पुण्यातील सेवानिवृत्त महिलेची आयुष्यभराची जमापुंजी क्षणात गायब
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल