मार्गात बदल करण्याचे कारण काय?
पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पासाठी सुरुवातीला महाराष्ट्र रेल्वे डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने तयार केलेली अलाइन्मेंट नारायणगाव मार्गे होती. मात्र हा मार्ग जीएमआरटी या आंतरराष्ट्रीय खगोल-निरीक्षण केंद्राच्या परिसरातून जाणार असल्याने विज्ञान-तंत्रज्ञान विभाग आणि अणुऊर्जा विभागाने त्यावर आक्षेप नोंदवला होता.
रेल्वे लाइनमुळे दुर्बिणीची निरीक्षण प्रक्रिया बाधित होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आल्याने या प्रकल्पासाठी नवीन पर्यायी मार्गाचा आराखडा तयार करण्यात आला. राज्य सरकार, तज्ज्ञ आणि स्थानिक जनप्रतिनिधींशी झालेल्या चर्चेनंतर जीएमआरटीचे संवेदनशील क्षेत्र वगळत सुधारित आणि पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे.
advertisement
या सुधारित मार्गामुळे पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक या तीनही जिल्ह्यांतील अंतर आणखी कमी होणार आहे. प्रकल्प पूर्णत्वास गेल्यानंतर प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होईल या भागांमधील कनेक्टिव्हिटीत मोठ्या प्रमाणावर सुधारणा होईल.






