TRENDING:

हृदयद्रावक! हातातले फुगे विखुरले, रक्ताचा सडा पडला; पण पुण्यात IT कर्मचाऱ्यांनी चिमुकल्याला मृत्यूच्या दारातून खेचलं परत

Last Updated:

रस्त्यावर फुगे विकून पोट भरणाऱ्या एका १४ वर्षीय मुलाला भरधाव ट्रकने चिरडलं. मात्र, आयटी कर्मचाऱ्यांची तत्परता आणि प्रशासनाच्या समन्वयामुळे या मुलाला मृत्यूच्या दारातून सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : हिंजवडी आयटी पार्कमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला माणुसकीचं दर्शन घडवणारी एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. रस्त्यावर फुगे विकून पोट भरणाऱ्या एका १४ वर्षीय मुलाला भरधाव ट्रकने चिरडलं. मात्र, आयटी कर्मचाऱ्यांची तत्परता आणि प्रशासनाच्या समन्वयामुळे या मुलाला मृत्यूच्या दारातून सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आहे.
फुगे विकणाऱ्या चिमुकल्याचा अपघात (AI Image)
फुगे विकणाऱ्या चिमुकल्याचा अपघात (AI Image)
advertisement

अपघात आणि आयटी कर्मचार्‍यांची धावपळ: रविवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास, हिंजवडीत जड वाहनांना बंदी असतानाही एका भरधाव ट्रकने फुगे विकणाऱ्या मुलाला जोरदार धडक दिली. मुलाच्या पायाला गंभीर इजा होऊन प्रचंड रक्तस्राव होत होता. हे पाहून तेथून जाणाऱ्या आयटी कर्मचार्‍यांनी क्षणाचाही विलंब न लावता त्याला गाडीत बसवलं आणि पिरंगुटच्या रुग्णालयात नेलं. मात्र, तिथे उपचार नाकारले गेल्याने आणि नंतर सूस येथील रुग्णालयातही जागा न मिळाल्याने कर्मचाऱ्यांची मोठी ओढाताण झाली.

advertisement

अखेर दुपारी दीड वाजता मुलाला पुण्यातील संचेती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. आर्थिक अडचणींमुळे उपचारात अडथळा येण्याची शक्यता निर्माण झाली होती. अशावेळी फोरम फॉर आयटी एम्प्लॉईजने (FITE) थेट पीएमआरडीए आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्याशी संपर्क साधला. डॉ. म्हसे यांनी तातडीने संचेती हॉस्पिटलचे डॉ. पराग संचेती यांच्याशी चर्चा केली. दुबईत असूनही डॉ. संचेती यांनी तत्काळ उपचारांचे आदेश दिले आणि मुलाची यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
धोक्याची घंटा! भारतात 80 टक्क्यांहून अधिक मनोरुग्ण उपचारांपासून वंचित, काय घडतंय
सर्व पहा

दुसरीकडे, हिंजवडी पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित ट्रक चालकाला ताब्यात घेतलं आहे. बंदी असतानाही आयटी पार्कमध्ये जड वाहन आणल्याबद्दल त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आयटी कर्मचारी आशुतोष पांडे, प्रशांत पंडित आणि पवनजीत माने यांच्या सतर्कतेमुळे एका निरागस मुलाचा जीव वाचला असून, सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
हृदयद्रावक! हातातले फुगे विखुरले, रक्ताचा सडा पडला; पण पुण्यात IT कर्मचाऱ्यांनी चिमुकल्याला मृत्यूच्या दारातून खेचलं परत
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल