लक्ष्मी आंदेकरचा विजय
लक्ष्मी आंदेकरने प्रभाग क्रमांक 23 (क) मधून विजय मिळवला आहे. भाजपच्या उमेदवाराचा पराभव करून लक्ष्मी आंदेकरने दणदणीत विजय मिळवला. राष्ट्रवादीकडून लक्ष्मी आंदेकरला तिकीट देण्यात आलं होतं. भाजपच्या ऋतूजा गडाळे यांना 9752 मतं मिळाली असून लक्ष्मी आंदेकरला 9833 मतं मिळाली. यामध्ये लक्ष्मी आंदेकरचा फक्त 81 मतांनी विजय झाला. सासूनंतर आता सुनेचा देखील विजय झाल्याने आनंद व्यक्त केला जातोय.
advertisement
सोनाली आंदेकरने मारली बाजी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोनाली आंदेकर यांनी या चुरशीच्या लढतीत बाजी मारली आहे. त्यांना एकूण 10,809 मते मिळाली असून त्यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मोठी आघाडी घेतली. त्यांच्या विरोधात उभ्या असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रतिभा धंगेकर यांना 8,859 मतांवर समाधान मानावे लागले, तर भारतीय जनता पक्षाच्या अनुराधा मंचे यांना 7,807 मते मिळाली आहेत. या प्रभागात प्रस्थापित नेत्यांच्या नातेवाईकांची प्रतिष्ठा पणाला लागली होती, मात्र मतदारांनी सोनाली आंदेकर यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवला आहे.
लक्ष्मी आंदेकरला जामीन मिळणार?
दरम्यान, लक्ष्मी आंदेकर जामीन प्रकरणावर 16 तारखेला म्हणजे आज अंतिम सुनावणी (फायनल आर्ग्युमेंट) होणार आहे. त्यामुळे आता लक्ष्मी आंदेकरला जामीन मिळणार का? असा सवाल विचारला जात आहे.
