या सहा रस्त्यांवर शुल्क लागू होणार: १. लक्ष्मी रोड २. जंगली महाराज (JM) रस्ता ३. फर्ग्युसन कॉलेज (FC) रस्ता ४. बालेवाडी हायस्ट्रीट ५. विमाननगर रस्ता ६. बिबवेवाडी मुख्य रस्ता
पार्किंगचे दर आणि क्षमता: महानगरपालिकेच्या प्रस्तावानुसार, दुचाकी वाहनांसाठी प्रतितास ४ रुपये शुल्क आकारले जाणार आहे. या सहा रस्त्यांवर एकूण ६,३४४ दुचाकी आणि ६१८ चारचाकी वाहने पार्क करण्याची क्षमता असून, या माध्यमातून पालिकेला वर्षाला सुमारे १२ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे.
advertisement
पुण्यातील बाजारपेठांमध्ये, विशेषतः लक्ष्मी रोडवर, स्थानिक व्यावसायिक आणि कर्मचारी सकाळीच वाहने उभी करतात. ज्यामुळे खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना जागा मिळत नाही. तसेच, रस्त्यांवरील बेशिस्त पार्किंगमुळे वाहतूक कोंडीत भर पडते. सध्या महापालिकेच्या वाहनतळांवर तासाला २० रुपये मोजावे लागतात, त्या तुलनेत रस्त्यावरील हे पार्किंग शुल्क सर्वसामान्यांना परवडणारे असेल.
२०१८ मध्ये मंजुरी मिळालेल्या या पार्किंग धोरणाला तब्बल सात वर्षांनंतर मुहूर्त लागला आहे. सध्या महानगरपालिका निवडणुकांची आचारसंहिता संपल्यानंतर या योजनेच्या अंमलबजावणीबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल.
