Pune Accident : पहाटे उठले, दुचाकीत पेट्रोल भरलं अन् कामावर निघाले पुण्यातील 2 मित्र; रस्त्यातच काळानं गाठलं
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
सकाळी सहाच्या सुमारास हडपसरकडून वाघोलीच्या दिशेने ते कामावर जात होते. वाटेत सिरम कंपनीसमोरील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून ते पुन्हा मुख्य रस्त्यावर आले.
पुणे : पुणे-अहमदनगर महामार्गावरील मांजरी परिसरात एका भीषण अपघाताची घटना घडली. वाघोली रस्त्यावरील सिरम कंपनीसमोर एका मिनी बसने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात २० वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून, त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेली माहिती अशी की, मूळचा दौंड तालुक्यातील केडगावचा रहिवासी असलेला आदित्य बाळासाहेब शेळके (वय २०) आणि त्याचा मित्र मनोहर अण्णा रणसिंग हे दोघे कामावर निघाले होते. शनिवारी (१७ जानेवारी) सकाळी सहाच्या सुमारास हडपसरकडून वाघोलीच्या दिशेने ते कामावर जात होते. वाटेत सिरम कंपनीसमोरील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून ते पुन्हा मुख्य रस्त्यावर आले. मात्र, तेव्हाच मांजरीच्या दिशेने येणाऱ्या मिनी बसने त्यांच्या दुचाकीला भीषण धडक दिली.
advertisement
ही धडक इतकी भयानक होती की, यात आदित्य शेळकेचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्याचा मित्र मनोहर रणसिंग याला गंभीर दुखापत झाली असून, त्याच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
लोणी काळभोर पोलिसांनी याप्रकरणी तातडीने कारवाई करत मिनी बस चालक माऊली अंभोरे (वय २३, रा. आव्हाळवाडी) याला ताब्यात घेतले आहे. ऐन विशीत असलेल्या तरुणाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने केडगाव परिसरावर शोककळा पसरली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, बस चालकाचा निष्काळजीपणा या अपघाताला कारणीभूत आहे का, याची चौकशी केली जात आहे.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 18, 2026 12:02 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Accident : पहाटे उठले, दुचाकीत पेट्रोल भरलं अन् कामावर निघाले पुण्यातील 2 मित्र; रस्त्यातच काळानं गाठलं







