Kalyan : कल्याणच्या मुकुटात मानाचा तुरा! देशातील पहिली हायटेक फ्युनिक्युलर ट्रॉली मलंग गडावर सज्ज

Last Updated:

India Longest Funicular Malanggad Yatra : श्री मलंगगडावर जाण्यासाठी देशातील सर्वात मोठी फ्युनिक्युलर ट्रॉली सेवा सुरू झाली आहे.

News18
News18
कल्याण : श्री मलंगगडावर जाणाऱ्या भाविकांसाठी आनंदाची बातमी आहे. देशातील सर्वात मोठ्या आणि लांब पल्ल्याच्या फ्युनिक्युलर ट्रॉलीचे काम पूर्ण झाले असून ही सेवा आजपासून भाविकांच्या सेवेत दाखल झाली आहे. आज या फ्युनिक्युलर ट्रॉलीचे लोकार्पण भाजप आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यामुळे मलंगगडावर जाणाऱ्या भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.
मलंग गडावर धावली देशातील पहिली 'फ्युनिक्युलर' ट्रॉली
शासनाच्या तपासणीनंतर मुंबई मंत्रालयातून फ्युनिक्युलर सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडूनही यासाठी अधिकृत मंजुरी मिळाली आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर भाविकांना मोठा दिलासा देत सुप्रीम कंपनीकडून पहिल्या दोन दिवसांसाठी मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांना विनामूल्य आणि सुरक्षित प्रवासाचा लाभ घेता येणार आहे.
advertisement
हा प्रकल्प आमदार किसन कथोरे यांनी 2004 मध्ये मांडला होता. प्रत्यक्षात या प्रकल्पाच्या कामाला 2012 मध्ये सुरुवात झाली. मात्र विधानसभा क्षेत्राच्या विभाजनानंतर हा प्रकल्प काही काळ रखडला होता. त्यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना त्यांच्या प्रयत्नांमुळे नव्या ठेकेदाराची नेमणूक करण्यात आली आणि कामाला पुन्हा गती मिळाली.
advertisement
तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण तसेच खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे या महत्त्वाच्या प्रकल्पाला बळ मिळाले. आता फ्युनिक्युलर ट्रॉली सुरू झाल्याने मलंगगडाचा प्रवास अधिक सुरक्षित, सोयीस्कर आणि जलद होणार आहे.
श्री मलंगगड यात्रेच्या पूर्वसंध्येला ही सेवा सुरू झाल्याने भाविकांसाठी ही मोठी सुविधा ठरणार असूनयंदाची यात्रा अधिक सुखकर होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे
view comments
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Kalyan : कल्याणच्या मुकुटात मानाचा तुरा! देशातील पहिली हायटेक फ्युनिक्युलर ट्रॉली मलंग गडावर सज्ज
Next Article
advertisement
BMC Mayor Election: राज-उद्धव यांच्यात फोनवरून चर्चा, शिवसैनिकच महापौर, राऊतांनी  मुंबईतील सत्तेचा सस्पेन्स वाढवला
राज-उद्धव यांच्यात फोनवरून चर्चा, शिवसैनिकच महापौर, राऊतांनी मुंबईतील सत्तेचा स
  • बीएमसी सत्ता स्थापनेतील सस्पेन्स वाढत चालला आहे.

  • शिंदे गटाने आपल्या नगरसेवकांना मुंबईतील हॉटेलमध्ये ठेवले आहे.

  • ठाकरे गटाचे नेते, प्रवक्ते संजय राऊत यांच्या वक्तव्याने मुंबईतील राजकारण चांगलंच

View All
advertisement