Astrology: खूप काळ त्रासच होत नशिबी; 23 जानेवारीचा गजकेसरी योग 4 राशींचे नशीब पालटणार, अविश्वसनीय लाभ
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Astrology: ग्रहांच्या राशीपरिवर्तनामुळे शुभ-अशुभ योग वेळोवेळी तयार होतात. ज्योतिषशास्त्रानुसार गजकेसरी योग हा अत्यंत शुभ मानला जातो, जो आयुष्यात अचानक सकारात्मक बदल घडवून आणतो. 23 जानेवारी 2026 रोजी निर्माण होणारा हा योग शिक्षण, बुद्धी, धन आणि मान-सन्मानासाठी अत्यंत फलदायी ठरणार आहे. विशेषतः 4 राशींच्या जातकांसाठी हा काळ भाग्योदयाचा असेल.
शुक्रवार, 23 जानेवारी 2026 रोजी चंद्रमा मीन राशीत गोचर करतील, तर गुरु ग्रह कर्क राशीत विराजमान असतील. चंद्रापासून चतुर्थ भावात गुरु असल्यामुळे हा प्रबळ गजकेसरी योग तयार होत आहे. याच दिवशी बुध ग्रह श्रवण नक्षत्रात प्रवेश करेल. विशेष म्हणजे, दुसऱ्याच दिवशी वसंत पंचमी आणि सरस्वती पूजन असल्याने या योगाचा प्रभाव अधिकच शुभ आणि फलदायी राहील.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
मीन राशी: मीन राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत शुभ असेल. गुरु, चंद्र आणि बुधाच्या प्रभावामुळे करिअर आणि व्यवसायात मोठी प्रगती होईल. ज्ञान आणि शिक्षणात रुची वाढेल. धनलाभासोबतच सामाजिक आणि कौटुंबिक नातेसंबंध अधिक घट्ट होतील. तुमचा आत्मविश्वास या काळात उंचावलेला असेल.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)









