Car Mileage Testing : एसी चालू ठेवूनच करा कार टेस्ट, सरकारच्या सूचना; सांगितला कसा होतो गडबड घोटाळा

Last Updated:
Car Mileage AC Testing : कार टेस्ट करताना एसी चालू ठेवणं बंधनकारक असावं, असा प्रस्ताव सरकारने मांडला आहे. या मसुद्यावर 30 दिवसांसाठी हरकती आणि सूचना मागवल्या आहेत.
1/7
कार खरेदी करायची असेल तर सगळ्यात आधी विचार केला जातो तो मायलेजचा. कारची मायलेज म्हणजे ठराविक प्रमाणात इंधन वापरून कार किती अंतर चालते याचं मोजमाप. भारतामध्ये मायलेज साधारणपणे किलोमीटर प्रती लीटर (km/l) मध्ये मोजलं जातं. जर एखादी कार 1 लीटर पेट्रोलमध्ये 18 किलोमीटर चालत असेल तर तिचं मायलेज 18 km/l.

advertisement
2/7
मायलेज महत्त्वाचं का असतं? तर जितकं जास्त मायलेज तितकं कमी इंधन खर्च. कारची मायलेज म्हणजे गाडीची इंधन बचतीची क्षमता. जास्त मायलेज म्हणजे जास्त बचत. रोज प्रवास करणाऱ्यांसाठी खूप पैसे वाचतात आणि कमी इंधन जळत असल्याने पर्यावरणासाठीही उपयुक्त.

3/7
पण तुम्ही पाहिलं असेल कार खरेदी केल्यानंतर ती रस्त्यावर प्रत्यक्ष चालवताना मात्र कंपनीने सांगितलेलं मायलेज देत नाही. त्यापेक्षा कमी मायलेज असतं. गाडीचा वेग, ट्रॅफिक, रस्त्यांची स्थिती, टायरचा प्रेशर, कारची सर्व्हिसिंग आणि एसी या सगळ्यांचा परिणाम मायलेजवर होतो.  त्यामुळे आता मायलेज टेस्ट बदलणार आहे. सरकार नवीन मायलेज टेस्ट लागू करणार आहे.

4/7
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने 1 ऑक्टोबर 2026 पासून भारतात विकल्या जाणाऱ्या सर्व प्रवासी गाड्यांचं मायलेज  एसी ऑन ठेवून करण्याचा प्रस्ताव मांडला आहे.सध्या बहुतेक चाचण्या एसीशिवाय केल्या जातात, ज्यामुळे कंपन्यांनी नोंदवलेले आकडे आणि प्रत्यक्ष रस्त्यावरील मायलेजमध्ये लक्षणीय तफावत दिसून येते. त्यामुळे यापुढे  फ्यूल एफिशिएन्सी टेस्टिंगवेळी एसी चालू ठेवणं बंधनकारक असेल. 

5/7
मसुद्याच्या नियमांनुसार M1 श्रेणीतील प्रवासी वाहनांसाठी मायलेज चाचण्या आता AIS-213 मानकांनुसार घेतल्या जातील. यासाठी कारचा एसी चालू असणं आवश्यक आहे आणि त्या स्थितीत इंधन कार्यक्षमता मोजली जाईल. आजकाल बहुतेक लोक एसीशिवाय गाडी चालवत नसल्यामुळे हा बदल ग्राहकांना अधिक विश्वासार्ह मायलेज डेटा प्रदान करेल आणि कंपन्यांकडून कठोर अनुपालनाची अंमलबजावणी करेल. सरकारने या मसुद्यावर 30 दिवसांसाठी हरकती आणि सूचना मागवल्या आहेत.

6/7
कंपनी जे मायलेज सांगते ते लॅब टेस्टमध्ये असतं. प्रत्यक्ष रस्त्यावरचं मायलेज साधारणपणे 10–25% कमी असू शकतं. भारतामध्ये वाहनाचं अधिकृत मायलेज प्रामुख्याने ARAI (Automotive Research Association of India) किंवा ICAT यांसारख्या संस्थांमार्फत तपासलं जातं.

7/7
वाहन डायनामोमीटर (rolling road) वर ठेवतात प्रत्यक्ष रस्त्याऐवजी लॅबमध्ये नियंत्रित परिस्थिती असते. ठराविक वेग, वेळ आणि गियर पॅटर्न वापरतात. City Cycle – कमी वेग, थांबा-चालू,  Highway Cycle – स्थिर, मध्यम वेग आणि या दोन्हीचा सरासरी आकडा म्हणजे कंपनीचं अधिकृत मायलेज पण यावेळी एसी, जास्त वजन, ट्रॅफिक गृहीत धरले जात नाहीत. त्यामुळे कंपनीचं मायलेज जास्त वाटतं. पण प्रत्यक्ष मायलेज टेस्ट कमी असते.

BJP: लेकानं विजयाचा गुलाल उधळला अन् दोन दिवसानंतर वडिलांनी घेतला अखेरचा श्वास, मुंबईतील भाजप नेत्याचं निधन
लेकानं विजयाचा गुलाल उधळला अन् दोन दिवसांत वडिलांनी घेतला अखेरचा श्वास, मुंबईतील
  • कुलाबा-मुंबादेवी परिसराचे सलग २५ वर्षे प्रतिनिधित्व करणारे राज पुरोहित यांचे निध

  • भाजपचा अनुभवी आणि निष्ठावान नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त

  • भाजपचे नगरसेवक आकाश पुरोहित हे त्यांचे पुत्र आहेत.

View All
advertisement