SSC Hall Ticket : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट! 2 दिवसात ऑनलाईन उपलब्ध होणार 'हॉल तिकीट'; असं करा डाउनलोड
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची घोषणा केली आहे.
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची घोषणा केली आहे. फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या दहावीच्या परीक्षेची प्रवेशपत्रे म्हणजेच हॉल तिकीट येत्या मंगळवारपासून (२० जानेवारी) ऑनलाइन उपलब्ध होणार आहेत.
शाळांसाठी महत्त्वाची प्रक्रिया: राज्यातील सर्व माध्यमिक शाळांना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून (www.mahahsscboard.in) ही प्रवेशपत्रे 'लॉगिन' करून डाउनलोड करता येतील. शाळांनी हे हॉल तिकीट प्रिंट करून, त्यावर मुख्याध्यापकांचा शिक्का आणि स्वाक्षरी घेऊन ती विद्यार्थ्यांना द्यायची आहेत. विशेष म्हणजे, हॉल तिकीटची प्रिंट काढून देण्यासाठी शाळांनी विद्यार्थ्यांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क घेऊ नये, अशा स्पष्ट सूचना मंडळाने दिल्या आहेत.
advertisement
हॉल तिकीटवरील विद्यार्थ्याचे नाव, फोटो, सही किंवा विषयामध्ये काही त्रुटी किंवा चुका असल्यास, शाळांना त्या ऑनलाइन पद्धतीने दुरुस्त करता येतील. मात्र, जर फोटो किंवा स्वाक्षरीमध्ये बदल करायचा असेल, तर शाळांनी त्या दुरुस्त्या विभागीय मंडळाकडे प्रत्यक्ष जाऊन करून घेणे आवश्यक आहे.
advertisement
परीक्षेचे वेळापत्रक: दहावीची मुख्य परीक्षा २० फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होत आहे. परीक्षेला अवघे काही दिवस शिल्लक असल्याने विद्यार्थ्यांनी आपली हॉल तिकिटे शाळेतून वेळेवर प्राप्त करून घ्यावीत आणि त्यावरील माहिती तपासून घ्यावी, असे आवाहन मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी केले आहे.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 18, 2026 11:31 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
SSC Hall Ticket : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट! 2 दिवसात ऑनलाईन उपलब्ध होणार 'हॉल तिकीट'; असं करा डाउनलोड










