Pune PMC Election : पुण्यात हातात सत्ता होती, दादांच्याही लक्षात आली नाही चूक; निकालानंतर लावला असेल डोक्याला हात!

Last Updated:
Ajit Pawar NCP Pune PMC Election : पुण्यात भाजपने एकहाती बाजी मारली अन् राष्ट्रवादी काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या होत्या, तरी देखील अजित पवारांना एक चूक भारी पडली.
1/7
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांच्या विश्लेषणात भारतीय जनता पक्षाने मिळवलेले यश हे केवळ जनमतावर नसून 'मतांच्या विभाजनावर' अधिक अवलंबून असल्याचे स्पष्ट झालं आहे.

advertisement
2/7
अजित पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र तर आणल्या खऱ्या पण अजितदादांना विरोधकांची मोट बांधता आली नाही. पुण्यातील 13 वेगवेगळ्या प्रभागांतील 26 हून अधिक जागांवर भाजपने विजय मिळवला, जिथं विरोधी पक्षांमधील फूट त्यांच्या पथ्यावर पडली.

3/7
अनेक ठिकाणी तर पराभूत उमेदवारांच्या मतांची एकत्रित बेरीज ही विजयी उमेदवाराच्या एकूण मतांपेक्षाही जास्त असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. या मतविभाजनाचा सर्वात मोठा फटका राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला बसला असून, हे रोखण्यात अजित पवार यांना अपयश आल्याचं दिसतंय.

4/7
राज्य निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, भाजपने बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीचा आणि मित्रपक्षांच्या स्वतंत्र लढण्याचा पुरेपूर फायदा घेतला. हडपसर, कोरेगाव पार्क, आणि सहकारनगर सारख्या महत्त्वाच्या भागांतही हेच चित्र होते.

5/7
उदाहरणार्थ, प्रभाग 16 मध्ये मारुती तुपे यांच्या विजयात 'उबाठा' गटाला मिळालेली मतं भाजपसाठी निर्णायक ठरली. यामुळे अनुभवी नगरसेवक योगेश ससाणे यांना पराभवाचा सामना करावा लागला, जे राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठं नुकसान मानले जात आहे.

6/7
एकूणच, पुण्यातील 12 महत्त्वाच्या भागांमध्ये भाजपने विजयाचा झेंडा फडकवला असला तरी, विरोधातील मतांची एकजूट असती तर चित्र वेगळं दिसलं असतं. अजित पवारांना याचा कमीतकमी 19 ते 25 जागेवर फायदा झाला असता.

7/7
दरम्यान, रामबाग कॉलनीपासून ते अप्पर-इंदिरानगरपर्यंत भाजपला मिळालेला 'जायंट किलर'चा दर्जा हा अंशतः विरोधी पक्षांमधील समन्वयाच्या अभावामुळे मिळाला आहे. आगामी काळात जिल्हा परिषदेला मतविभाजनाची गळती रोखणं हे महाविकास आघाडीसमोरचे सर्वात मोठं आव्हान असणार आहे.

BJP: लेकानं विजयाचा गुलाल उधळला अन् दोन दिवसानंतर वडिलांनी घेतला अखेरचा श्वास, मुंबईतील भाजप नेत्याचं निधन
लेकानं विजयाचा गुलाल उधळला अन् दोन दिवसांत वडिलांनी घेतला अखेरचा श्वास, मुंबईतील
  • कुलाबा-मुंबादेवी परिसराचे सलग २५ वर्षे प्रतिनिधित्व करणारे राज पुरोहित यांचे निध

  • भाजपचा अनुभवी आणि निष्ठावान नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त

  • भाजपचे नगरसेवक आकाश पुरोहित हे त्यांचे पुत्र आहेत.

View All
advertisement