संसद भवनात कोल्हापुरी चपलांचा रुबाब, ओम बिर्लांनीही पडली भुरळ, पन्हाळ्याच्या महेश पोवार यांची मोठी झेप

Last Updated:

Traditional kolhapuri Footwear Global Demand : संसद भवनातील भारत ऑन द मूव्ह प्रदर्शनात कोल्हापुरी पादत्राणांनी देश-विदेशातील पाहुण्यांचे लक्ष वेधले. पारंपरिक कारागिरी आणि आधुनिक डिझाइनमुळे कोल्हापुरी चपलांना मोठा प्रतिसाद मिळाला.

News18
News18
कोल्हापुर : राष्ट्रकुल परिषदेच्या पार्श्वभूमीवर संसद भवन परिसरात 'भारत ऑन द मूव्ह’' या भारतीय उत्पादनांच्या भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाला देश-विदेशातील प्रतिनिधी होते. विशेषतहा महाराष्ट्राच्या पारंपरिक वारशाचे प्रतीक असलेल्या कोल्हापुरी पादत्राणांच्या 'शैलेश फूटवेअर' या स्टॉलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. प्रदर्शनाच्या दोन्ही दिवशी या स्टॉलसमोर पाहुण्यांची सतत गर्दी पाहायला मिळाली.
वारसा जपणारी कोल्हापुरी चपलांची ओळख
कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा येथील उद्योजक महेश पोवार यांनी या स्टॉलद्वारे कोल्हापुरी चपलांची समृद्ध परंपरा सादर केली. 500 रुपयांपासून ते 50 हजार रुपयांपर्यंत किमतीच्या विविध डिझाइनच्या चपलांना मोठी मागणी होती. विदेशी पाहुण्यांनी कोल्हापुरी चपलांची रचना, टिकाऊपणा आणि हाताने तयार करण्याची प्रक्रिया जाणून घेतली. अनेकांनी आपल्या कुटुंबीयांसाठी मापानुसार चपला तयार करून घेण्याची इच्छा व्यक्त केली.
advertisement
या परिषदेदरम्यान लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह विविध राष्ट्रांतील संसदाध्यक्ष आणि सभापतींनी या स्टॉलला भेट देत पोवार यांच्याशी संवाद साधला. त्यांनी कोल्हापुरी पादत्राणांच्या इतिहासासह पारंपरिक कारागिरीबाबत माहिती दिली.
पिढ्यान्‌पिढ्या चालत आलेला 'शैलेश फूटवेअर'चा वारसा
शैलेश फूटवेअर या व्यवसायाला सुमारे 70 वर्षांची कौटुंबिक परंपरा असून कोल्हापूरच्या राजघराण्यापासून अनेक नामवंत राजकीय नेते येथे पादत्राणे खरेदी करतात. औंध संस्थानाच्या हत्तीसाठी खास तयार करण्यात आलेल्या कोल्हापुरी चपलांमुळेही हा ब्रँड चर्चेत आला होता.
advertisement
या प्रदर्शनासाठी आणलेल्या सुमारे 500 जोड चपलांपैकी बहुतेक विकल्या गेल्याचे पोवार यांनी सांगितले. याआधी दिल्ली, आग्रा, बेंगळुरू येथेही त्यांनी यशस्वी सहभाग घेतला असून सूरजकुंड (हरियाणा) येथील प्रदर्शनासाठीही त्यांना आमंत्रण मिळाले आहे.
'प्राडा मेड इन इंडिया'साठी महेश पोवार यांची निवड
दरम्यान इटलीतील नामांकित प्राडा कंपनीने कोल्हापुरी चपलांपासून प्रेरणा घेत त्या जागतिक स्तरावर सादर करण्याचा निर्णय घेतला आहे.प्राडा मेड इन इंडिया या उपक्रमासाठी निवड झालेल्या कारागिरांमध्ये महेश पोवार यांचा समावेश आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
संसद भवनात कोल्हापुरी चपलांचा रुबाब, ओम बिर्लांनीही पडली भुरळ, पन्हाळ्याच्या महेश पोवार यांची मोठी झेप
Next Article
advertisement
BMC Mayor Election: राज-उद्धव यांच्यात फोनवरून चर्चा, शिवसैनिकच महापौर! राऊतांनी  मुंबईतील सत्तेचा सस्पेन्स वाढवला
राज-उद्धव यांच्यात फोनवरून चर्चा, शिवसैनिकच महापौर! राऊतांनी मुंबईतील सत्तेचा स
  • बीएमसी सत्ता स्थापनेतील सस्पेन्स वाढत चालला आहे.

  • शिंदे गटाने आपल्या नगरसेवकांना मुंबईतील हॉटेलमध्ये ठेवले आहे.

  • ठाकरे गटाचे नेते, प्रवक्ते संजय राऊत यांच्या वक्तव्याने मुंबईतील राजकारण चांगलंच

View All
advertisement