युद्धात जिंकले तहात हरणार, भाजपचं महापौर पद अडचणीत? शिंदेंनंतर आणखी एका नेत्याने केली अडचण

Last Updated:

अमरावती महानगरपालिका निवडणुकीत २५ जागांसह भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मात्र सत्तेच्या चाव्या मिळवणं भाजपसाठी अवघड ठरत आहे.

News18
News18
अमरावती महानगरपालिका निवडणुकीत २५ जागांसह भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मात्र सत्तेच्या चाव्या मिळवणं भाजपसाठी अवघड ठरत आहे. इथं भाजपला बहुमतासाठी १९ नगरसेवकांची गरज आहे. इथं भाजपचे मित्र पक्ष असलेल्या युवा स्वाभीमानी पक्ष आणि अजित पवार गटाकडे तितकं संख्याबळ देखील आहे. मात्र या दोन्ही पक्षातील अंतर्गत गटबाजी आणि टोकाचे मतभेद चव्हाट्यावर आल्याने भाजपचं महापौरपद अडचणीत आलं आहे.
अमरावती महापालिकेत भाजपने २५ जागांवर विजय मिळवला आहे. त्यापाठोपाठ बडनेराचे आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाला १५ जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ११ आणि शिवसेना (शिंदे गट) ३ जागांवर विजयी झाला आहे. ८७ सदस्यसंख्या असलेल्या अमरावतीत बहुमताचा आकडा ४४ आहे. भाजपला इथं सत्ता स्थापन करण्यासाठी १९ नगरसेवकांची आवश्यकता आहे. पण रवी राणा आणि संजय खोडके यांच्यातील वादाचा भाजपला फटका बसत आहे.
advertisement
आमदार रवी राणा यांनी 'युवा स्वाभिमान'च्या मदतीने भाजपचा महापौर होईल, अशी घोषणा केली असली तरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार संजय खोडके यांनी खोडा घातला आहे. "भाजप जर रवी राणांची मदत घेणार असेल, तर आम्ही सत्तेत सहभागी होणार नाही," अशी स्पष्ट भूमिका खोडके यांनी घेतली आहे. दुसरीकडे, शिवसेना शिंदे गटाने अजून आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली आहे.
advertisement
अमरावतीत १५ जागा मिळवून रवी राणा सध्या 'किंगमेकर'च्या भूमिकेत आहेत. भाजपला पाठिंबा देताना ते 'स्थायी समिती सभापती' पदाची मागणी करण्याची शक्यता आहे. महापालिकेत तिजोरीच्या चाव्या राणांकडे गेल्या तर आपल्याला काय मिळणार? यावरून अजित पवार गट सत्तेत जाण्यास इच्छुक नाही. तसेच राणांकडे तिजोरीच्या चाव्या देण्यास भाजप कितपत इच्छुक असेल? हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे. अजित पवार गट आणि युवा स्वाभीमानी पक्ष एकत्र आले नाहीत, तर भाजपचं महापौरपद अडचणीत येऊ शकतं. मुंबईत शिवसेना शिंदे गट किंगमेकरच्या भूमिकेत आहे. तिथं तिसऱ्या क्रमांकाची सेनेला मिळाली आहेत. मुंबईत सत्ता स्थापनेसाठी शिंदेंची आवश्यकता आहे. मात्र तिथे शिंदेंनी भाजपची कोंडी करत महापौर पदासाठी फिल्डिंग लावली आहे. असाच काहीसा प्रयोग अमरावतीत देखील बघायला मिळत आहे.
advertisement
अमरावतीत महायुतीचा विजय झाला असला तरी येथील स्थानिक भाजप नेते नवनीत राणांवर नाराज आहेत. त्यांनी नवनीत राणांच्या हकालपट्टीची मागणी केलीय. आमचा पराभव जनतेनं नव्हे तर नवनीत राणांनी केलाय, असा आरोप भाजपच्या स्थानिक नेत्यांनी केला आहे.
नवनीत राणा यांनी स्वतःला 'स्टार प्रचारक' दर्शवून भाजप उमेदवारांना योजनापूर्वक पाडण्याचे काम केलं, असा आरोप देखील भाजप नेत्यांनी केला आहे.
Click here to add News18 as your preferred news source on Google.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
युद्धात जिंकले तहात हरणार, भाजपचं महापौर पद अडचणीत? शिंदेंनंतर आणखी एका नेत्याने केली अडचण
Next Article
advertisement
BMC Mayor Election: राज-उद्धव यांच्यात फोनवरून चर्चा, शिवसैनिकच महापौर! राऊतांनी  मुंबईतील सत्तेचा सस्पेन्स वाढवला
राज-उद्धव यांच्यात फोनवरून चर्चा, शिवसैनिकच महापौर! राऊतांनी मुंबईतील सत्तेचा स
  • बीएमसी सत्ता स्थापनेतील सस्पेन्स वाढत चालला आहे.

  • शिंदे गटाने आपल्या नगरसेवकांना मुंबईतील हॉटेलमध्ये ठेवले आहे.

  • ठाकरे गटाचे नेते, प्रवक्ते संजय राऊत यांच्या वक्तव्याने मुंबईतील राजकारण चांगलंच

View All
advertisement