TRENDING:

Pune Crime : पुण्यात खळबळ! डेक्कन परिसरात PSI ने स्वत:ला संपवलं, हॉटेलमध्ये भयंकर अवस्थेत आढळला मृतदेह

Last Updated:

Pune Police Sub-Inspector Ends Life : गेल्या 8 ते 10 दिवसांपासून ते रजेवर होते, मात्र बुधवारी सकाळी पुण्याच्या डेक्कन परिसरातील आपटे रोडवर असलेल्या एका हॉटेलमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Pune Police Sub-Inspector Ends Life : पुण्यातील प्रसिद्ध डेक्कन जीमखाना परिसरातील हॉटेलमध्ये घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने सध्या पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून आपल्या कर्तव्यावरून रजेवर असलेल्या एका तरुण व्यक्तीचा शोध घेताना धक्कादायक वास्तव समोर आले असून, या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस यंत्रणेने मोबाइल लोकेशनच्या तांत्रिक मदतीने शोध घेतला असता एका बंद खोलीत हा सर्व प्रकार उघडकीस आला.
Pune Police Sub Inspector Suraj Marathe Ends Life
Pune Police Sub Inspector Suraj Marathe Ends Life
advertisement

2 वर्षांपूर्वीच पोलीस दलात भरती

तासगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक सूरज मराठे यांनी विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली आहे. 26 वर्षीय सूरज हे आळंदीचे रहिवासी असून केवळ 2 वर्षांपूर्वीच ते पोलीस दलात भरती झाले होते. गेल्या 8 ते 10 दिवसांपासून ते रजेवर होते, मात्र बुधवारी सकाळी पुण्याच्या डेक्कन परिसरातील आपटे रोडवर असलेल्या एका हॉटेलमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला.

advertisement

हॉटेलचा दरवाजा तोडला अन्...

हॉटेलच्या खोलीतून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने दरवाजा तोडला असता हा प्रकार समोर आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या या घटनेचा सविस्तर पंचनामा करण्यात आला असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. या घटनेमागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून, पोलीस प्रशासन या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहे.

advertisement

सुसाईड नोट सापडली...

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांच्या पदरी निराशा, सोयाबीन दर घसरले,तूर आणि कांद्याला काय मिळाला भाव?
सर्व पहा

दरम्यान, सुरज मराठे यांचे कुटुंबीय पुणे जिल्ह्यातील देहू येथे राहतात. अत्यंत कमी वयात पोलिस दलात अधिकारी पदावर झेप घेणाऱ्या या तरुण अधिकाऱ्याने केवळ शारीरिक त्रासामुळे आयुष्य संपवल्याने एकच हळहळ व्यक्त होत आहे. घटनास्थळी पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली असून, त्यात त्यांनी आपल्या आजारपणाचा उल्लेख केला आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime : पुण्यात खळबळ! डेक्कन परिसरात PSI ने स्वत:ला संपवलं, हॉटेलमध्ये भयंकर अवस्थेत आढळला मृतदेह
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल