TRENDING:

संत तुकाराम महाराज बीज: पिंपरी-चिंचवडहून देहूकडे जाणारे हे मार्ग 3 दिवस बंद, पर्यायी रस्ते कोणते?

Last Updated:

Sant Tukaram Maharaj Beej: संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त मोठ्या संख्येने भाविक देहूत येत असतात. याच पार्श्वभूमीवर वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
Choose
News18 on Google
advertisement
पुणे: संत तुकाराम महाराज यांच्या बीज उत्सवासाठी देहूत मोठ्या प्रमाणात भाविक दाखल होत असतात. यंदा ५ मार्चला बीज उत्सव होत आहे. या काळात कोणत्याही भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेकडून 4 ते 6 मार्च दरम्यान वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. उपायुक्त विवेक पाटील यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. भक्ती-शक्ती चौक, मोईफाटा, एच.पी. चौक, संविधान चौक, कृष्णानगर चौक तसेच कुदळवाडी सर्कल या मार्गांवरून वाहतूक वळविण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
संत तुकाराम महाराज बीज: पिंपरी-चिंचवडहून देहूकडे जाणारे हे मार्ग 3 दिवस बंद, पर्यायी रस्ते कोणते?
संत तुकाराम महाराज बीज: पिंपरी-चिंचवडहून देहूकडे जाणारे हे मार्ग 3 दिवस बंद, पर्यायी रस्ते कोणते?
advertisement

हे मार्ग राहणार बंद

उत्सव काळात देहूकडे जाणाऱ्या काही प्रमुख मार्गांवर वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. देहूगाव कमान (जुना मुंबई–पुणे महामार्ग) ते देहू मार्ग, महिंद्रा सर्कल ते फिजुत्सु कॉर्नर, कॅनबे चौक आणि आयटी पार्क चौक हा रस्ता बंद राहील. तसेच तळेगाव–चाकण रोडवरील देहू फाटा ते देहूगाव मार्गही वाहतुकीसाठी बंद असेल.

advertisement

संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त देहूत कडक निर्बंध, इंद्रायणीचे पाणी वापरास बंदी, कारण काय?

View More

आयटी पार्क व कॅनबे चौक ते काळोखे पाटील चौक, त्रिवेणीनगर चौक (निगडी) ते तळवडे चौक, डायमंड चौक ते देहू मार्ग या मार्गांवरही निर्बंध असतील. 14 टाळकरी कमान ते भैरवनाथ चौक आणि काळोखे पाटील चौक ते देहू मुख्य कमान व परंडवाल चौक दरम्यान वाहतूक बंद राहणार आहे. दरम्यान, जुना पालखी मार्ग (कंद पाटील चौक ते झेंडे मळा जकात नाका) हा वन-वे करण्यात आला असून झेंडेमळ्याकडून कंद पाटील चौकाकडे प्रवेशबंदी लागू असेल.

advertisement

पार्किंगची विशेष व्यवस्था

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नोकरी सोडली अन् ‘मायमराठी’च्या सेवेत हजर, पुणेकराचं काम पाहाल, तर सलाम कराल, Vid
सर्व पहा

उत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंगची सोय करण्यात आली आहे. आळंदी–तळवडे मार्गे येणाऱ्या वाहनांसाठी माउली वजनकाटा तसेच काळोखे पाटील चौक आणि लगतच्या गायरान परिसरात पार्किंगची व्यवस्था असेल. देहू कमान मार्गे येणाऱ्या भाविकांनी राधाकृष्ण लॉन्स शेजारील सीओडीच्या जागेत वाहन उभी करावीत, अशी सूचना करण्यात आली आहे. देहू फाटा मार्गे येणाऱ्यांसाठी सप्तपदी लॉन्स, येलवडी शॉपिंग कॉम्प्लेक्स, भगीरथी लॉन्स तसेच साईराज चौक ते देहू फाटा दरम्यान वाहनतळाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
संत तुकाराम महाराज बीज: पिंपरी-चिंचवडहून देहूकडे जाणारे हे मार्ग 3 दिवस बंद, पर्यायी रस्ते कोणते?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल