नेमकी फसवणूक कशी झाली?
मिळालेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्यांनी तक्रारदार ज्येष्ठ नागरिकाच्या मोबाईलवर संपर्क साधून त्यांना शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या विविध योजना सांगितल्या. "कमी गुंतवणुकीत मोठा नफा" मिळेल, असे आमिष दाखवून चोरट्यांनी त्यांचा विश्वास संपादन केला.
सुरुवातीला आजोबांनी काही रक्कम गुंतवली असता, चोरट्यांनी त्यांना बनावट ॲपच्या माध्यमातून मोठा नफा झाल्याचे भासवले. हा नफा पाहून आजोबांनी अधिक गुंतवणुकीचा निर्णय घेतला आणि टप्प्याटप्प्याने एकूण २९ लाख ३० हजार रुपये चोरट्यांनी सांगितलेल्या बँक खात्यांवर जमा केले. मात्र, जेव्हा त्यांनी स्वतःची मूळ रक्कम आणि नफा काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा चोरट्यांनी संपर्क तोडला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत धाव घेतली.
advertisement
अलंकार पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीता रोकडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. अनोळखी व्यक्तींनी दिलेल्या गुंतवणुकीच्या टिप्सवर विश्वास ठेवू नका आणि कोणत्याही संशयास्पद लिंकवर पैसे पाठवू नका, असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.
