पुण्यातील नवले पुलावर पुन्हा एकदा भीषण अपघात घडला असून, या दुर्घटनेत जवळपास 7 ते 8 जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. 2014 ते 2022 या काळात कात्रज नवीन बोगदा ते वडगाव पूल 4 किलोमीटरच्या अंतरात 185 अपघात झाले आहेत, ज्यात 65 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
Pune News : नवले ब्रिजवर विचित्र अपघात, दोन आग लागलेल्या ट्रकमध्ये कार अडकली, अपघाताचा LIVE VIDEO
advertisement
अपघाताची कारणे काय?
तीव्र उतार: कात्रज नवीन बोगदा ते नवले पुलापर्यंत खूप तीव्र उतार आहे. त्यामुळे अवजड वाहनांचा वेग मोठ्या प्रमाणात वाढतो आणि चालकांचे वाहनावरचे नियंत्रण पूर्णपणे सुटते. त्यामुळे वेगावरचे नियंत्रण सुटणे आणि ब्रेक फेल होणे अशा घटना घडतात.
पुलाची चुकीची रचना: वारंवार अपघात घडत असलेल्या नवले पुलाची रचना अपघातास कारणीभूत असल्याचे अनेकांकडून सांगण्यात येते.
दरम्यान, 20 नोव्हेंबर 2022 रोजी एका भरधाव ट्रकने सुमारे 30 हून अधिक गाड्यांना धडक दिली होती. तर आता पुन्हा एकदा एका कंटेनरने ट्रक आणि काही कारना धडक दिल्याने भीषण अपघात झाला. नवले पुलावरील अपघातांची ही मालिका गंभीर मुद्दा बनवला असून यावर तोडगा काढण्याची मागणी आता प्रवासी आणि पुणेकरांकडून होत आहे.





