या कालावधीत केशवराव जेधे चौक स्वारगेट येथील भुयारी मार्गाने सारसबागकडे जाणारा रस्ता (अण्णाभाऊ साठे पुतळा मार्गे) वाहतुकीसाठी बंद राहील. पर्यायी मार्ग म्हणून भुयारी मार्ग सुरु होताना डावीकडील रस्त्याने जेधे चौकाकडे जाऊन तेथून सारसबागकडे (अण्णाभाऊ साठे पुतळा मार्गे) जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
रस्ता बंद करण्याचं कारण काय?
भुयारी मार्गातील पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी बसवलेले लोखंडी चॅनल तुटले आहे. त्यामुळे पावसाचे पाणी नीट वाहून जात नाही आणि साचून राहात आहे. यामुळे वाहनचालकांना अडचणी निर्माण होत होत्या. शिवाय तुटलेल्या चॅनलमुळे मोठा आवाजही होत होता. या कारणांमुळे नागरिक आणि स्थानिकांनी वारंवार तक्रारी करून मागणी केली होती . मात्र, पावसाळ्यात मोठे काम करणे कठीण असल्याने, तसेच व्हीआयपी दौरे आणि गणेश कला क्रीडा मंचाच्या ठिकाणी असलेल्या कार्यक्रमामुळे पोलिसांकडून हा मार्ग बंद ठेवण्यासाठी वेळ दिला जात नव्हता. अखेर आता परवनागी देण्यात आली आहे.
advertisement
पर्यायी मार्गाचा वापर करा
या दोन दिवसांत हे लोखंडी चॅनल बदलून नवीन चॅनल बसविण्यात येणार असून, ड्रेनेज लाइनची स्वच्छता आणि मजबुतीकरणाचे कामही करण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात पावसाचे पाणी साचणार नाही आणि वाहनधारकांना त्रास होणार नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. दरम्यान, वाहनचालकांनी या कालावधीत दिलेल्या पर्यायी मार्गाचा वापर करून वाहतूक पोलीसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.