Pune News: पुणेकरांनो लक्ष द्या, 22 सप्टेंबरपर्यंत स्वारगेटचा भुयारी मार्ग बंद; मग कोणता पर्यायी मार्ग?

Last Updated:

Pune Swargate: नेहमी वर्दळ असणारा पुण्यातील स्वारगेट येथील भुयारी मार्ग चार दिवसांसाठी बंद करण्यात आला आहे.

Pune Road Closed
Pune Road Closed
पुणे : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. नेहमी वर्दळ असणारा पुण्यातील स्वारगेट येथील भुयारी मार्ग चार दिवसांसाठी बंद करण्यात आला आहे. पुणे शहरातील स्वारगेट वाहतूक विभाग अंतर्गत केशवराव जेधे चौक (स्वारगेट) येथील भुयारी मार्ग दुरुस्तीची कामे दिनांक 19 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 11 वाजल्यापासून ते दिनांक 22 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत करण्यात येणार आहेत. या कालावधीत वाहतूक सुरक्षित व सुरळीत राहावी यासाठी पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस उप-आयुक्त (वाहतूक), हिंमत जाधव यांनी दिली.
या कालावधीत केशवराव जेधे चौक स्वारगेट येथील भुयारी मार्गाने सारसबागकडे जाणारा रस्ता (अण्णाभाऊ साठे पुतळा मार्गे) वाहतुकीसाठी बंद राहील. पर्यायी मार्ग म्हणून भुयारी मार्ग सुरु होताना डावीकडील रस्त्याने जेधे चौकाकडे जाऊन तेथून सारसबागकडे (अण्णाभाऊ साठे पुतळा मार्गे) जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

रस्ता बंद करण्याचं कारण काय? 

भुयारी मार्गातील पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी बसवलेले लोखंडी चॅनल तुटले आहे. त्यामुळे पावसाचे पाणी नीट वाहून जात नाही आणि साचून राहात आहे. यामुळे वाहनचालकांना अडचणी निर्माण होत होत्या. शिवाय तुटलेल्या चॅनलमुळे मोठा आवाजही होत होता. या कारणांमुळे नागरिक आणि स्थानिकांनी वारंवार तक्रारी करून मागणी केली होती . मात्र, पावसाळ्यात मोठे काम करणे कठीण असल्याने, तसेच व्हीआयपी दौरे आणि गणेश कला क्रीडा मंचाच्या ठिकाणी असलेल्या कार्यक्रमामुळे पोलिसांकडून हा मार्ग बंद ठेवण्यासाठी वेळ दिला जात नव्हता. अखेर आता परवनागी देण्यात आली आहे.
advertisement

पर्यायी मार्गाचा वापर करा

या दोन दिवसांत हे लोखंडी चॅनल बदलून नवीन चॅनल बसविण्यात येणार असून, ड्रेनेज लाइनची स्वच्छता आणि मजबुतीकरणाचे कामही करण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात पावसाचे पाणी साचणार नाही आणि वाहनधारकांना त्रास होणार नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. दरम्यान, वाहनचालकांनी या कालावधीत दिलेल्या पर्यायी मार्गाचा वापर करून वाहतूक पोलीसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
मराठी बातम्या/पुणे/
Pune News: पुणेकरांनो लक्ष द्या, 22 सप्टेंबरपर्यंत स्वारगेटचा भुयारी मार्ग बंद; मग कोणता पर्यायी मार्ग?
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement