पुणे महापालिका निवडणूक आंदेकर टोळी गाजवणार, तिघे रिंगणात उतरण्याच्या तयारीत; बंडूअण्णाची कोर्टात माहिती

Last Updated:

गेली पंचवीस वर्षं आंदेकर कुटुंबातील अनेकजण पुणे महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून येत यंदा देखील तीन जण निवडणुकीसाठी रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहे.

PMC Election 2025
PMC Election 2025
अभिजीत पोते, प्रतिनिधी
पुणे : गेली चार दशके पुण्याच्या गुन्हेगारी क्षेत्रात दबदबा निर्माण केलेली आंदेकर टोळी गेल्या वर्षभरापासून कुटुंब कलहात अडकली आहे. मागील पाच दशकांपासून आंदेकर कुटुंबाची पुण्यातील मध्यवर्ती भागात दहशत राहिलीय . त्यातील पंचवीस वर्षं आंदेकर कुटुंबातील अनेकजण पुणे महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून येत गेल्यानं या दहशतीला राजकीय पाठबळही वेळोवेळी मिळत गेलं. आगामी निवडणुकांसाठी देखील आंदेकर कुटुंबातील तीन जण उभे राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. ही माहिती स्वत: आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरने कोर्टात दिली आहे.
advertisement
आयुष कोमकर हत्या प्रकरण आज कोर्टात सुनावणी झाली. कोमकर हत्येप्रकरणी वृंदवनी वाडेकर, लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली वनराज आंदेकर या तिघींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तर बंडू आंदेकरसह इतर सर्व आरोपींना 29 सप्टेंबर पर्यंतची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

सोनाली आंदेकरच्या चर्चा

आयुष कोमकर हत्या प्रकरणी आज बंडू आंदेकर यांच्या दोन्ही सुनांना पुणे पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं होते. माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येनंतर त्या जागेवर पत्नी नगरसेवक पदाची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे. अजित पवार गटाकडून उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. निवडणुकीसाठी तयारीही सुरू झाल्याची माहिती होती. मात्र, या खूनप्रकरणात सोनाली आंदेकरचे नाव पुढे आल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
advertisement

कोण कोण उभं राहणार?

बंडू आंदेकरने कोर्टात सांगितले की, मला पोलिसांनी दिलेली धमकी सांगितल्याबद्दल पोलीस मला ओरडले. मला आमच्या घरात कोण कोण नगरसेवक आहेत आणि कोण कोण निवडणुकीला उभे राहणार आहेत हे विचारलं. मी लक्ष्मी, सोनाली आणि शिवम यांची नावे सांगितली. त्यामुळे आज दुपारी माझी सून सोनालीला अटक केली आहे.
advertisement

आज काय घडलं? 

आयुष कोमकर हत्या प्रकरणात सध्या संपूर्ण आंदेकर कुटुंब पुणे पोलिसांच्या ताब्यात घेतली. यापूर्वी कृष्णा आंदेकर पोलिसांसमोर हजर झाला होता . वनराज आंदेकर याची पत्नी सोनाली आंदेकर ही पुणे पोलिसांच्या रडारवर होती. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत सोनाली आंदेकरला ताब्यात घेतलं आहे. मात्र इतरांवर जरब बसवणाऱ्या या आंदेकर कुटुंबातील अंतर्गत संघर्षच आता त्यांच्या अंगलट आला आहे.
मराठी बातम्या/पुणे/
पुणे महापालिका निवडणूक आंदेकर टोळी गाजवणार, तिघे रिंगणात उतरण्याच्या तयारीत; बंडूअण्णाची कोर्टात माहिती
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement